जपानी वाहन उत्पादक कंपनी Honda Motors ची ‘WR-V’ ही कार क्रॅश टेस्टिंगमध्ये अपयशी ठरली आहे. लॅटिन NCAP येथे क्रॅश टेस्टिंगदरम्यान एसयूव्हीला फक्त १-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले. या Honda WR-V चा भारतीय बाजारात सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॉडेल्समध्ये समावेश आहे. गेल्या महिन्यात त्याची ४१५ युनिट्सची विक्री झाली. तसेच, सब-फोर मीटर विभागातील टॉप-१० विक्री यादीमध्ये त्याचा समावेश करण्यात आला. तथापि, त्याच्या सुरक्षिततेच्या क्रमवारीवर त्याच्या विक्रीवर परिणाम होऊ शकतो. हे WR-V चे दोन एअरबॅग मॉडेल आहे. ही टेस्टिंग याच महिन्यात सप्टेंबर २०२२ मध्ये झाली आहे.

Honda WR-V चे क्रॅश टेस्ट रेटिंग

जेव्हा Honda WR-V ची क्रॅश टेस्टिंग घेण्यात आली तेव्हा त्याला एडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी ४१ टक्के सुरक्षितता स्कोअरसह चाइइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी ४१ टक्के सुरक्षा स्कोअर मिळाले. याला पादचारी शोधण्यासाठी ५९ टक्के गुण मिळाले. त्यामुळे याला ५ पैकी फक्त १ स्टार रेटिंग मिळाले. या रेटिंगनुसार ही कार एडल्टसाठी तसेच लहान मुलांसाठीही सुरक्षित नाही.

आणखी वाचा : Hero Motocorp ‘या’ दिवशी सादर करणार आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर

Honda WR-V वर २७,००० सूट

या महिन्यात, Honda WR-V वर १० हजार रुपयांची एक्सचेंज सूट देत आहे. यासोबतच ५ हजार रुपयांची कॉर्पोरेट सूटही मिळणार आहे. होंडा ग्राहकांना लॉयल्टी बोनस अंतर्गत ५ हजार रुपयांचा लाभ दिला जाईल. त्याच वेळी, होंडा ते होंडा कार एक्सचेंज बोनसमुळे ७ हजार रुपयांचा अतिरिक्त फायदा होईल.

Honda WR-V ची सुरक्षा फीचर्स

एसयूव्हीलाला अॅडव्हान्स्ड कंपॅटिबिलिटी इंजिनिअरिंग बॉडी स्ट्रक्चर, ड्युअल एआरएस एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), EBD, गाइडलाइंससह मल्टी-व्ह्यू रिअर कॅमेरा, रियर पार्किंग सेन्सर्स, ईसीयू इमोबिलायझर सिस्टम, ड्रायव्हर साइड विंडो टच मिळते.

Story img Loader