किआ या कंपनीने ४,१०,००० वाहने परत मागवली आहेत. अपघातादरम्यान या वाहनांमधील एअरबॅग न उघडण्याची समस्या कंपनीला आढळून आली होती. परत मागवलेल्या वाहनांमध्ये २०१७ आणि २०१८ मधील काही फोर्ट स्मॉल कार तसेच २०१७ ते २०१९ मधील सेडोना मिनीव्हॅन आणि सोल स्मॉल एसयूव्हीचा समावेश आहे. यामध्ये सोलच्या इलेक्ट्रिक मॉडेलचा समावेश आहे.
नक्की काय झालं?
किआने सांगितले की एअरबॅग कंट्रोल कव्हर मेमरी चिपच्या संपर्कात येऊ शकते आणि इलेक्ट्रिकल सर्किट खराब करू शकते आणि ते अपघाताच्या वेळी एअरबॅग फुगण्यापासून रोखू शकते. किआने डीलर्सना सॉफ्टवेअर अपडेट करण्यास किंवा ते बदलण्यास सांगितले आहे. दोषपूर्ण मॉडेल्सच्या मालकांना २१ मार्चपासून मेलद्वारे सूचित केले जाईल.
(हे ही वाचा: Cheapest Car Loan: नवीन कार घेण्याचा विचार करत आहात? कोणती बँक देते स्वस्त कर्ज जाणून घ्या)
(हे ही वाचा: Mahindra Scorpio 2022 नव्या रुपातच नाही तर नवीन नावासह होणार लॉंच!)
या आधीही झाली आहे ही अशी घटना
याआधी ह्युंदाई मोटरने २६००० हजारांहून अधिक वाहने खराब झाल्यामुळे परत बोलावली होती. विंडशील्डच्या समस्येमुळे कंपनीने ही वाहने परत मागवली. कंपनीने यूएसमधील २०२० आणि २०२१ एलांट्रा, सांता फे आणि सोनाटा सेडान मॉडेल्सच्या एकूण २६,४१३ युनिट्ससाठी हे रिकॉल केले आहे.
(हे ही वाचा: २०२२ मारुती सुझुकी बलेनो नवीन अवतारात होणार लॉंच! जाणून घ्या हाय-टेक फीचर्सबद्दल)
टेस्लाची ६ लाख ७५ हजारांहून अधिक वाहने नादुरुस्त
यापूर्वी टेस्लाने अमेरिका आणि चीनच्या बाजारात विकल्या गेलेल्या ६ लाख ७५ हजारहून अधिक कार परत मागवल्या होत्या. अलीकडच्या काही दिवसांत, टेस्लाने यूएस मार्केटमधून एकूण ४,७५,३१८ कार आणि चीनच्या बाजारपेठेतून एकूण २००,००० कार परत मागवल्या. टेस्ला मॉडेल ३ आणि टेस्ला मॉडेल एस मॉडेल्सच्या ट्रंक आणि फ्रंट हूडमध्ये समस्या होती. हे दोन्ही भाग सुरक्षेशी संबंधित असल्याने कंपनीने ते परत मागवणे योग्य मानले. टेस्ला मॉडेल ३ च्या एकूण ३५६,३०९ युनिट्स यूएस मार्केटमधून परत मागवण्यात आल्या होत्या, तर टेस्ला मॉडेल एसच्या एकूण 1,19,109 युनिट्स परत मागवण्यात आल्या होत्या. कंपनीचे म्हणणे आहे की टेस्ला मॉडेल ३ मधील १ टक्के आणि टेस्ला मॉडेल एस कारच्या १४ टक्के सुरक्षेच्या समस्या होत्या आणि त्या लवकरच सोडवल्या जातील.