दसऱ्याला किंवा दिवाळीला तुम्ही नवीन बाइक घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे. तो पर्याय म्हणजे हिरो एचएफ १०० (Hero HF 100). हिरो एचएफ १०० ही बाइक सध्या भारतातील सर्वात स्वस्त बाईक आहे. तुम्ही जर आता येणाऱ्या सणांच्या शुभमुहूर्तावर नवीन बाईक घेण्याचा विचार करत असाल तर हिरी एचएफ १०० तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकेल. काय आहे या बाइकची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हिरो एचएफ १०० ची सुरूवातीची किंमत ६० हजारांपेक्षा कमी आहे. या बाइकची दिल्ली शोरूम किंमत ५५,४५० रूपये आहे. काही दिवसांपुर्वी कंपनीकडुन बाइकची किंमत थोडी वाढवण्यात आली होती. या बाइकचे फीचर्स जाणून घेऊया

आणखी वाचा : २० लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या पाच आकर्षक कार लवकरच होणार लाँच; पाहा यादी

मायलेज
या हीरो बाईकमध्ये पेटंट i3s किंवा आयडिअल-स्टार्ट-स्टॉप सिस्टम उपलब्ध आहे. यामुळेच या बाइकद्वारे कमी पेट्रोल वापरले जाते. ही बाईक ७० kmpl चा मायलेज देते

इंजिन आणि स्पीड
हिरो एचएफ १०० मध्ये ९७.२ सीसी ४-स्ट्रोक, सिंगल सिलेंडर, फ्युअल इंजेक्टेड, एअर-कूल्ड इंजिन आहे. त्याचे इंजिन ८,००० rpm वर ७.९१ bhp ची कमाल पॉवर आणि ५,००० rpm वर ८.०५ Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. यात ४-स्पीड गिअरबॉक्स मिळतो.

बाइक डायमेंशन
हिरो एचएफ १०० ची लांबी १९६५ मिमी, रुंदी ७२० मिमी आणि उंची १०४५ मिमी आहे. त्याचा व्हीलबेस १२३५ मिमी आणि ग्राउंड क्लिअरन्स १६५ मिमी आहे. त्याची केडर उंची ८०५ मिमी आहे.

Bike Hack : बाइकचे मायलेज वाढवण्यासाठी मदत करतील ‘या’ टिप्स; एकदा पाहाच

वजन आणि पेट्रोल क्षमता
या बाईकचे वजन ११० किलो आहे. यात ९.१लीटरची पेट्रोल टाकी उपलब्ध आहे. ही बाइक सध्या एकाच रंगामध्ये उपलब्ध आहे.