दसरा दिवाळी या सणांच्या शुभमुहूर्तावर अनेकजण नवीन कार घेण्याचा विचार करत असतील. तुम्हीदेखील नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यातील उत्तम पर्याय कोणते आहेत, तसेच बजेटमध्ये बसणाऱ्या गाड्या कोणत्या आहेत असे अनेक प्रश्न पडत असतील. सध्या भारतात मारुती सुझुकीच्या तीन गाड्या सर्वात लोकप्रिय आहेत आणि त्यांची सर्वात जास्त विक्री होत आहे. तुम्ही जर नवीन गाडी विकत घेणार असाल तर या गाड्यांचा विचार करू शकता.
मारुती सुझुकीने यावर्षी अनेक मॉडेल्सचे अपडेटेड वर्जन लाँच केले आहेत. अपडेटेड मॉडेल्समध्ये बलेनो, एर्टिगा, एक्सएल६, ब्रेझा, अल्टो के१० आणि ग्रँड विटारा या मिड साईज समावेश आहे. यातील विशेष बाब म्हणजे मारुती ब्रेझा, ग्रँड विटारा आणि बलेनो या गाड्या सर्वाधिक लोकप्रिय आहेत. तिन्ही गाड्या अपडेटेड वर्जनमध्ये उपलब्ध आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की तिला अपडेटेड ब्रेझा सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीसाठी एक लाखांहून अधिक बुकिंग प्राप्त झाले आहेत. तसेच इतर दोन मॉडेल्सची मागणी देखील खूप जास्त आहे. त्यामुळेच येणाऱ्या सणांच्या काळात या गाड्यांची आणखी जास्त विक्री होण्याची कंपनीला आशा आहे.
आणखी वाचा : पेट्रोल की डिझेल कोणती कार विकत घ्यावी? जाणून घ्या कोणता पर्याय आहे उत्तम
ब्रेझा (Brezza)
- ब्रेझाने २०२२ मधील नव्या व्हेरिएंटच्या स्वरूपात नवी ओळख निर्माण केली आहे.
- ही एसयुव्ही बाह्य डिझाइन, केबिन लेआउट तसेच अनेक एडव्हान्स फीचर्ससह लाँच करण्यात आली आहे.
- १.५ लिटर पेट्रोल इंजिनसह यात पाच-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि ऑटोमॅटिक ट्रांसमिशन पर्याय उपलब्ध आहे.
- यामध्ये हेड अप डिस्प्ले (HUD), सराउंड-व्ह्यू कॅमेरा आणि सनरूफ यांसारखे अनेक मॉडर्न फीचर्स उपलब्ध आहेत.
बलेनो (Baleno)
- इतर कंपन्यांशी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मारुती सुझुकीने आपली वाहने अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
- ब्रेझा हे सनरूफ असलेले मारुती सुझुकीचे पहिले मॉडेल होते, तर बलेनो हे पहिले एचयुडी मॉडेल आहे.
- कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या हॅचबॅकला १.५० लाख बुकिंगसह ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
आणखी वाचा : कारच्या मागच्या सीटवर बसणाऱ्यांनी सीटबेल्ट लावला नाही तर वाजणार अलार्म; केंद्र सरकार आणणार नवा नियम
ग्रँड विटारा (Grand Vitara)
- ग्रँड विटाराला ब्रेजाचे मोठे वर्जन मानले जाते.
- याशिवाय ग्रँड विटारा ही तांत्रिकदृष्ट्या टोयोटा अर्बन क्रूझर हायराईडरसारखी आहे.
- कंपनीला आतापर्यंत या मॉडेलसाठी सुमारे ५४,००० बुकिंग मिळाले आहेत.
- ही एसयुव्ही माईल्ड आणि स्ट्रॉंग दोन्ही हायब्रिड पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
- ऑफ-रोडसाठी ऑल-ग्रिप सिस्टमसह येणारी मारुती सुझुकीची ही पहिली एसयुव्ही आहे.