तुमच मोठ कुटुंब असेलं तर तुम्हाला नक्कीच मोठी कार हवी असेल. तुम्ही जर ७ सीटर कार तेही बजेटमध्ये शोधत असालं तर आम्ही तुमच्यासाठी एक पर्याय घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुम्हाला मारुती सुझुकीची सर्वात स्वस्त 7-सीटर कार Maruti Suzuki Ertiga (मारुती सुझुकी अर्टिगा) बद्दल सांगणार आहोत. ही कार सर्वात स्वस्त आहे. ज्याची किंमत ८ लाख रुपयांपेक्षा कमी आहे. देशातील सर्वाधिक मायलेज देणार्या ७-सीटर कारमध्ये गणली जाते.
टीप- मारुती सुझुकीच्या अर्टिगाच्या सर्व प्रकारांमध्ये विविध फीचर्स उपलब्ध आहेत. यामुळेच सर्व प्रकारांच्या किमती वेगवेगळ्या आहेत. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी कोणते फीचर आवश्यक आहे, ते तुम्ही मारुतीच्या वेबसाइटवर जाऊन तपासू शकता. येथे फक्त या प्रकारांच्या किमती नमूद केल्या आहेत.
(हे ही वाचा: Hero Pleasure Plus vs Honda Dio: मायलेज, स्टाईल आणि किमतीत कोण आहे बेस्ट? जाणून घ्या)
मारुती सुझुकी अर्टिगाचे प्रकार (Variants ) | मुंबईची एक्स-शोरूम किंमत |
मारुती सुझुकी अर्टिगा LXI (Maruti Suzuki Ertiga LXI) | ७.५४* लाख |
मारुती सुझुकी अर्टिगा VXI (Maruti Suzuki Ertiga VXI ) | ८.२७* लाख |
मारुती सुझुकी अर्टिगा ZXI (Maruti Suzuki Ertiga ZXI) | ९.०९* लाख |
(हे ही वाचा: Hero Splendor iSmart vs TVS Radeon: स्टाईल, मायलेज आणि किमतीमध्ये कोणता आहे सर्वोत्तम पर्याय? जाणून घ्या)
मारुती सुझुकीच्या अर्टिगाच्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर, ते मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये १९.०१ kmpl, ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये १७.९९ kmpl आणि CNG मॉडेलमध्ये २६.०८ kmpkg मायलेज देते. त्याचे १४६२cc K15B स्मार्ट हायब्रिड पेट्रोल इंजिन ६००० rpm वर ७७ KW ची कमाल पॉवर आणि ४४०० rpm वर १३४ Nm चे पीक टॉर्क जनरेट करते.