Car AC Cooling: तुमच्या कारचा एअर फिल्टर हा एक महत्त्वाचा घटक आहे. बऱ्याचदा कारमधील एसी व्यस्थित चालत नसल्यास आपली खूप चिडचिड होते. कारण- कारमधील एसी केबिन व्यवस्थित कूलिंग देत नसल्याने एसी व्हेंट्समधून दुर्गंध येतो. बऱ्याचदा यामध्ये केबिन एअर फिल्टर अडकलेले असतात. एसी व्हेंट्समधून केबिनमध्ये प्रवेश करणारी हवा बाहेरील दूषित घटकांतील स्वच्छ हवा केबिनमध्ये पोहोचवण्यासाठी फिल्टरमधून जाते. हे एसी फिल्टर किंवा केबिन एअर फिल्टर म्हणून ओळखले जाणारे हे फिल्टर हवेतील धूळ, घाण आणि इतर प्रदूषक काढून टाकण्यास मदत करते.

मात्र, कालांतराने एसीचे कूलिंग पूर्वीपेक्षा कमी होते. कारण- फिल्टरमध्ये धूळ व घाण जमा झाल्यामुळे हवेचा प्रवाह कमी होतो आणि त्यामुळे एसीची कार्यक्षमता कमी होते. तसेच, एअर फिल्टरमध्ये अडकलेले जीवाणू वाढतात आणि त्यामुळे त्यातून दुर्गंधी येते.

कारचे एअर फिल्टर तपासणे आणि बदलणे हे सोपे काम आहे; जे तुम्ही स्वतःदेखील करू शकता. या समस्येवर उपाय म्हणून तुम्ही जवळपास २००-५०० रुपयांच्या आसपास किंमत असलेले ऑनलाइन फिल्टर विकत घेऊ शकता. आधीचे जीवाणू अडकल्याने नादुरुस्त झालेले एअर फिल्टर बदलून तुम्ही या समस्येपासून सुटका करून घेऊ शकता.

कार केबिन एअर फिल्टर कसे बदलायचे?

सर्वांत आधी कारमधील केबिन एअर फिल्टर पाहा; जे सहसा डॅशबोर्डच्या खाली ग्लोव्ह कंपार्टमेंटच्या मागे असते.

त्यानंतर ग्लोव्ह बॉक्स उघडा आणि रिकामा करा. स्टॉप वेगळे करण्यासाठी ग्लोव्ह बॉक्स बाजूने दाबून आतल्या बाजूला ढकला.

फिल्टर हाउसिंग कव्हर काढा जे क्लिप, स्क्रू किंवा टॅबपासून सुरक्षित असेल.

जुन्या केबिन एअर फिल्टरला बाहेर काढा.

नवीन फिल्टर त्या निश्चित जागेवर ठेवण्याआधी फिल्टर हाऊसिंग साफ करा.

आता नवीन केबिन एअर फिल्टर हाऊसिंगमध्ये घाला आणि ते योग्य दिशेत लागले आहे की नाही याची खात्री करा.

फिल्टर हाउसिंग कव्हर पुन्हा जागेवर ठेवा आणि ग्लोव्ह कंपार्टमेंट पुन्हा जोडा.

सर्वांत शेवटी कारचा एसी चालू करा आणि हवेचा प्रवाह सुधारला आहे की नाही याचा तपास करा.

हेही वाचा: पावसाळ्यात स्कुटी आणि इलेक्ट्रिक बाईक सुरक्षित ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सात टिप्स

दरम्यान, वेळोवेळी तुमच्या कारच्या एसी सिस्टीममधील एअर फिल्टर नियमितपणे साफ किंवा बदलले जात असल्याची खात्री करून घ्या. कारण- जीवाणू अडकल्याने खराब झालेले एअर फिल्टर हवेच्या प्रवाहात अडथळा आणते आणि त्यामुळे केबिन थंड होण्यासाठी एसीला वेळ लागतो.