बंगळुरू आधारित EV स्टार्टअप कंपनी अल्ट्राव्हायोलेटने एका मुलाखतीत खुलासा केला आहे की F77, एक स्टाइलिश लुक असलेली इलेक्ट्रिक स्पोर्टी बाईक २०० Km ची रेंज देते. ही बाईक २०१९ मध्ये सादर करण्यात आली होती. पण त्यादरम्यान ही बाईक १४० km ची रेंज देत होती. कंपनीकडून करण्यात येत असलेला दावा खरा ठरला, तर भारतात जास्तीत जास्त ड्रायव्हिंग रेंजची निर्मिती करणारी ही पहिली बाईक असेल.
कंपनीने या बाइकमध्ये बॅटरीपासून ड्रायव्हिंग रेंजपर्यंत अनेक सुधारणा केल्या आहेत. ब्रँडने खात्री दिली आहे की या बाईककडे आधीपेक्षा उत्तम असण्याची अपेक्षा केली जाऊ शकते. तिच्या चार्जिंगच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. F77 इलेक्ट्रिक बाइकची फ्रेम देखील बदलण्यात आली आहे. तसेच बाईकचे वजन अधिक वाढले आहे, गुरुत्वाकर्षण केंद्र वाढले आहे आणि अधिक जड केली आहे.
आणखी वाचा : अवघ्या १ ते २ लाखांच्या बजेटमध्ये Hyundai Santro खरेदी करू शकता, जाणून घ्या ऑफर
किंमत किती असेल आणि कधी लॉंच होईल?
२०१९ मध्ये त्याचे सुरूवातीचे अनावरण झाल्यापासून, F77 ने त्याच्या अतुलनीय कामगिरीने आणि स्पोर्टबाईक डिझाइनने आधीच प्रेक्षकांना मोहित केलं आहे. ही बाईक केवळ शहरी बाईक बनवण्यासाठीच नव्हे तर ऑफ-रोड सेटिंग्जवर तिच्या क्षमतेची चाचणी करण्यासाठी ब्रँड काम करत आहे. ब्रँडने खात्री केली आहे की F77 २०२२ च्या पहिल्या तिमाहीत लाँच केली जाईल आणि बाईकची प्रारंभिक किंमत ३ लाख रुपयांच्या वर असण्याची शक्यता आहे.
कशी आहे डिझाईन आणि खास गोष्टी
अद्ययावत ई-बाईक F77 ला डिजिटल क्लस्टर मिळतो जो टचस्क्रीन नसून चार-बटणाचा मॉड्यूल आहे. बाइकच्या डिस्प्लेला कस्टम फॉन्ट मिळतो, जो बाइकच्या वेगानुसार रंग आणि वेग बदलतो. F77 पोर्टेबल चार्जर तसंच ऑन-बोर्ड चार्जरसह येतो, जो इतर ब्रँडच्या तुलनेत लहान आहे. पोर्टेबल चार्जर दोन तासांपेक्षा कमी वेळेत बॅटरी चार्ज करतो, तर ऑन-बोर्ड चार्जरने चार्ज होण्यासाठी जास्त वेळ लागतो. अद्ययावत अल्ट्राव्हायोलेट F77 मध्ये थोडे वेगळे हेडलाइट बेझेल डिझाइन दिसेल.