जानेवारी २०२३ मध्ये ऑटो एक्स्पोचे आयोजन होणार आहे. ऑटोमोटिव्ह सेक्टरमधील हा मोठा इव्हेंट आहे. कार चाहत्यांसाठी हा तर उत्सवच असतो. यामध्ये कंपन्या आपल्या नव्या वाहनांची झलक ग्राहकांना दाखवतात. ऑटो एक्स्पोतून कारला किती पसंती दिली जात आहे याचा अंदाज देखील कंपन्यांना येतो, तसेच वाहनाचे प्रमोशनही होते. पुढील वर्षी ऑटो एक्स्पोमध्ये काही दमदार एसयूव्ही सादर होऊ शकतात. या एसयूव्ही पुढील प्रमाणे आहेत.

१) ह्युंडाई क्रेटा फेसलिफ्ट

ह्युंडाई क्रेटा ही देशातील सर्वात लोकप्रिय मिड साइज एसयूव्ही आहे. बऱ्याच काळापासून तिचे अपडेटेड व्हेरिएंट लाँच झालेले नाही. ऑटो एक्स्पोच्या १६ व्या एडीशनमध्ये क्रेटा फेसलिफ्ट सादर होऊ शकते. यात टकसनवर आधारित डिजाइन आणि एडीएएस क्षमतेसह इतर फीचर मिळू शकतात. इंजिनमध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे.

Maruti Suzuki First electric car e Vitara
e Vitara: मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार! ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये करणार लाँच; पण, किंमत काय असणार
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
smart parking lots , Nashik , traffic Nashik ,
नाशिक शहरातील ३३ स्मार्ट वाहनतळांचे पुनरुज्जीवन, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आराखडा
New Honda Dio 2025
New Honda Dio 2025 : ७५ हजारांमध्ये लाँच झाली नवीन होंडा डियो; जाणून घ्या, काय आहेत नवीन फीचर्स
Most consumers eye EVs as next car charging gaps remain key concern: TCS study
इलेक्ट्रिक वाहनांबाबत ‘टीसीएस’ची महत्त्वपूर्ण भविष्यवाणी
cheapest electric car ligier mini ev could launch in 1 lakh rupees know features design battery details range
फक्त १ लाख रुपयात लॉंच होऊ शकते ‘ही’ इलेक्ट्रिक कार! सिंगल चार्जवर मिळेल १९२ किमीची रेंज
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
mini buses with best logo running on the Nashik Kasara route
मुंबईच्या रस्त्यांवर बेस्टच्या अनधिकृत गाड्या, नाशिक मार्गावरही बेस्टच्या गाड्यांचा वापर; कंत्राट रद्द झालेल्या गाड्यांचा गैरवापर

(ओलाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कुटर ग्राहकांसाठी सादर, १०० किमी रेंज, इतकी आहे टॉप स्पीड)

२) २०२३ टाटा हॅरियर

कंपनी हॅरिअरच्या फेसलिफ्ट व्हर्जनची चाचणी घेत होती. हे व्हर्जन ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये सादर हेण्याची शक्यता आहे. अपडेटेड मॉडेल नव्या रुपात येणार असल्याचे समजले आहे. तसेच एसयूव्हीला एडीएस सपोर्ट देखील मिळण्याची शक्यता आहे. कंपनी हॅरिअरचे नवे इंजिन देखील उपलब्ध करू शकते.

(Auto Expo 2023: इव्हेंट, कुठे आणि केव्हा होईल? तुम्हाला प्रवेश कसा मिळेल? कोणत्या कंपन्या करणार वाहने लाँच? जाणून घ्या सविस्तर)

३) मारुती सुझुकी जिमी ५ डोअर

मारुती सुझुकीची चाचणी जोमात सुरू आहे. ही कार महिंद्राच्या थारला टक्कर देणार आहे. अलिकडेच काही चित्रांमध्ये या एसयूव्हीची उंच भूभागावर चाचणी होत असल्याचे दिसून आले आहे. एसयूव्हीमध्ये १.५ लिटर के १५ सी इंजिन मिळेल, जे १०० बीएचपीची पीक पावर आणि १३० एनएमचा टॉर्क निर्माण करेल.

(पल्सर 250 की अपाचे २०० ४ व्ही, कोणती घ्यावी कळे ना? मग वाचा ही माहिती, निवडणे होइल सोपे)

४) मारुती सुझुकी बलेनो क्रॉस

भारतीय बाजारासाठी मारुती सुझुकी नवी एसयूव्हीची चाचणी घेत आहे. कंपीनीने एस क्रॉस बंद केली आहे. तिची रिप्लेसमेंट म्हणून बलेनो क्रॉस (व्हायटीबी) ही ऑटो एक्स्पोमध्ये सादर केली जाऊ शकते. बलेनो क्रॉस ही हर्टटेक प्लाटफॉर्मवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. एसयूव्हीमध्ये १.५ लिटर के १५ सी इंजिन मिळण्याची शक्यता आहे. नवे इंजिन मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(Auto Expo 2023: नवीन कार खरेदी करायच्या विचारात आहात? मारुतीसह ‘या’ कंपनीच्या कार बाजारात करणार धमाल)

५) महिंद्रा थार (५ डोअर)

एक्सयूव्ही ७०० आणि नव्या स्कॉर्पिओ एनमुळे महिंद्राला प्रचंड प्रसिद्धी आणि वाढ मिळाली आहे. ऑटो एक्स्पोमध्ये कंपनी ५ दारे असलेली थार सादर करू शकते. तिची चाचणी होत असल्याचे दिसून आले आहे. थारमध्ये पूर्वीसारखेच २.० लिटर गॅसोलिन आणि २.२ लिटर डिझेल इंजिन मिळण्याची शक्यता आहे.

Story img Loader