देशात रस्ते अपघातात दरवर्षी हजारो लोकांचा जीव जातो. यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाने वेळोवेळी अनेक नियम तयार केले आहेत. तसेच कायदे आणखी कठोर केले आहेत. त्याचबरोबर चारचाकी गाड्यांमध्ये एअरबॅग्स अनिवार्य केल्या आहेत. असं असलं तरी थ्री पॉइंट सीट बेल्ट जीवरक्षकाचं काम करत आहे. या बेल्टमुळे आतापर्यंत लाखो लोकांचे जीव वाचले आहेत. ६० वर्षांपूर्वी शोध लावलेल्या थ्री पॉइंट सीट बेल्टमुळे वाहनं चालवणं सुरक्षित झालं आहे. जगातील सर्वात सुरक्षित वाहन प्रयोग म्हणून याकडे आजही पाहिलं जातं. सीट बेल्ट भीषण अपघातात जीवन आणि मृत्यूमधील फरक स्पष्ट करतो. या बेल्टमुळे आतापर्यंत लाखो लोकांचे जीव वाचल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे.

सीट बेल्टचा संक्षिप्त इतिहास

Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत
Amravati leopard died marathi news
रस्ते फक्त माणसांसाठीच असतात का..? एका बिबट्याचा सवाल
pune To reduce problem of illegal parking of vehicles in no parking zones police launched towing van project
नो पार्किंगमध्ये वाहन लावल्यास आता दंड आणि ‘टोईंग’चा भुर्दंड

१९५९ मध्ये व्होल्वो अभियंता निल्स बोहलिन यांनी आधुनिक थ्री पॉइंट सीट बेल्ट विकसित केला. डिझाइनचे पेटंट असूनही कंपनीने पेटंट सर्वांसाठी खुलं ठेवण्याचा निर्णय घेतला. लाखो लोकांच्या जीवासाठी त्यांनी नफ्यावर पाणी सोडलं. सर्व वाहन उत्पादकांना विनामूल्य वापरासाठी उपलब्ध करून दिले. हा निर्णय सार्वजनिक सुरक्षेच्या हितासाठी घेण्यात आला आहे. हा निर्णय जगासाठी खूप फायदेशीर ठरला. आज थ्री पॉइंट सीट बेल्ट सर्व कार, ट्रक आणि बसमध्ये अनिवार्य आहे. तुम्ही असे म्हणू शकता की, रस्त्यावरील प्रत्येक वाहनामध्ये व्होल्वोचा महत्त्वाचा वाटा आहे. व्होल्वो बसेसने १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला सर्व सीटवर थ्री पॉइंट सीट बेल्ट लावला. “२००१ मध्ये आम्ही बेल्ट नसलेल्या आणि बेल्ट लावलेल्या दोन्ही गाड्यांची पूर्ण रोल ओव्हर चाचणी केली आहे. परिणाम निर्विवाद होता, थ्री पॉइंट सीट बेल्ट घातलेल्या रहिवाशांना खूप कमी जखमा झाल्या आणि बहुधा वास्तविक परिस्थितीत तसेच असेल.”असं व्होल्वो बसेसचे सेफ्टी मॅनेजर पीटर डॅनियलसन यांनी सांगितलं. यामुळे थ्री पॉइंट सीट बेल्टचे महत्त्व स्पष्ट आहे. विशेषत: जेव्हा इंटरसिटी आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी जातो, जेथे वाहन जास्त वेगाने जाते. तेव्हा अपघात घडण्याची जास्त शक्यता असते. आज युरोपमध्ये ६० टक्क्यांहून अधिक व्होल्वो कोच थ्री पॉइंट सीट बेल्टसह विकले जातात आणि स्कॅन्डिनेव्हियामध्ये हे प्रमाण १०० टक्के आहे.

“व्होल्वो बसेसने नुकतेच युरोपमधील सात देश आणि एकूण ६,००० प्रवाशांचे सर्वेक्षण केले आहे. एक प्रश्न बसमधील सीट बेल्टच्या वापराबाबत होता. स्वीडनमधील प्रवाशांपैकी दहापैकी आठ प्रवाशांनी उत्तर दिले की, ते नियमितपणे सीट बेल्ट वापरतात. इटलीमध्ये दहा पैकी तीन जण बेल्टचा वापर करतात. त्यामुळे बेल्टचा वापर १०० टक्के करण्याची गरज आहे. बहुतेक लोक प्रवासी कारमध्ये सीट बेल्ट वापरतात. मात्र बसमध्ये बेल्ट वापरणं टाळतात. त्यांनी बेल्ट वापरणं गरजेचं आहे.”, असं पीटर डॅनिएलसन यांनी सांगितलं. “एखाद्याला सीट बेल्ट न वापरता बसमध्ये बसणे सुरक्षित वाटू शकते. मात्र अपघातात बेल्ट न वापरणारे प्रवासी खिडक्यांमधून बाहेर फेकले जातात. तेव्हा त्यांच्यापैकी अर्धेच लोक वाचतात. कोच किंवा बसमधून प्रवास करताना सर्वात स्वस्त आणि साधा जीवन विमा म्हणजे सीट बेल्ट वापरणे हा आहे.”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

Story img Loader