अनेकदा रस्त्यांवर काही वाहने काळा धूर सोडताना दिसून येतात. हा धूर आरोग्याला तर धोकादायक आहेच, सोबतच ते पर्यावरणासाठी धोकादायक आहे. कार चालकही या बाबीकडे दुर्लक्ष करतात. मात्र या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास मोठे नुकसान होऊ शकते. वाहनातून काळा धूर निघण्याची समस्या ही कारमधील इंजिनच्या सिलिंडरमधील हवा आणि इधनाच्या प्रमाणातील गडबडीमुळे उद्भवते.
ही समस्या डिझेल वाहनामध्ये अधिक दिसून येते. वाहन जुने झाल्याने, तसेच अधिक वजनासह प्रवास केल्याने वाहनातून काळा धूर निघतो. अधिक वजनामुळे वाहनाच्या इंजिनवर अधिक ताण पडतो. त्यामुळे ही समस्या होते.
(वाहतुकीचा नियम चुकून तोडलाय? चालान जारी झाले की नाही याबाबत जाणून घेण्यासाठी ‘हे’ करा)
काळा धूर निघण्याची समस्या दूर करण्यासाठी हे करा
१) नियमित इंजिन ऑईल बदला
कारचे इंजिन ऑईल बदलत राहा. टाकलेले ऑईल अधिक काळ वापरू नका. याने इंजिनची क्षमता कमी होते. ही समस्या होऊ नये यासाठी इंजिन ऑईल बदलत राहा.
२) कारची नियमित सर्व्हिसिंग करा
कारची ठरलेल्या वेळी सर्व्हिसिंग करा. अन्यथा इंजिन खराब होऊ शकते आणि त्याची क्षमता कमी होऊ शकते आणि नंतर कार काळा धूर सोडते.
३) बिघाड झालेले भाग तातडीने बदला
जर वाहनातून काळा धूर निघत असेल तर त्यास तातडीने मेकॅनिकला दाखवा आणि बिघाड झालेले भाग बदलून टाका. अन्यथा एक भाग खराब झाल्यानंतर वाहनाचे इतर भागही हळू हळू खराब होतात. ते दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला नंतर अधिक पैसे खर्च करावे लागू शकतात. त्यामुळे आधीच मेकॅनिकला समस्या दाखवा.