इंधनाचे भाव वाढल्याने ग्राहक सीएनजी वाहनांकडे वळले आहे. सीएनजीमुळे ग्राहकांना चांगले मायलेज मिळत असून ते किफायतशीर असल्याने बचत देखील होत आहे. सीएनजी (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) हे पर्यावरणास अनुकूल असे इंधन असून ते परवडणारे देखील आहे. म्हणून ग्राहकांचा त्यांच्याकडे कल वाढला आहे. हे लक्षात घेत टोयोटाने नुकतेच बाजारात दोन नवीन सीएनजी कार ग्लान्झा आणि हायरायडर ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहेत. बाजारात सुझुकी आणि टाटाची सीएनजी वाहने देखील उपलब्ध आहेत. सीएनजी वाहन घेतल्यानंतर ते टिकवून ठेवण्यासाठी आणि सुरक्षित प्रवास आणि चांगले मायलेज मिळण्यासाठी तिची व्यवस्थित देखभाल करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही पुढील टिप्स फॉलो करू शकता.

१) केवळ अधिकृत सीएनजी किट घ्या

ठाणे : पोलिसांकडून आता ड्रोनद्वारे पाहाणी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
pune officers without helmet no entry
पुणे: सावधान ! महापालिकेच्या इमारतीमध्ये हेल्मेट शिवाय प्रवेश कराल तर…!
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
How many times you should wash your bedsheets cleaning tips to wash your sheets
तुम्ही तुमची बेडशीट महिन्यातून किती वेळा धुता? जाणून घ्या स्वच्छ करण्याच्या ‘या’ सोप्या टिप्स
2024 Maruti Suzuki Dzire Launch Live Updates: Prices start at Rs 6.79 lakh, to rival Honda Amaze
५ स्टार सेफ्टी रेटिंग, जबरदस्त मायलेज आणि आकर्षक लूकसह नवीन मारुती जनरेशन Dzire 2024 लाँच; पाहा किंमत

अनेक वाहन निर्मिती कंपन्यांनी आपल्या विविधी सीएनजी कार्स बाजारात उपलब्ध केल्या आहेत, ज्या चांगल्या आणि अधिक विश्वासार्ह आहेत. तुम्ही नवीन सीएनजी कार घेऊ शकता किंवा तुम्ही पेट्रोल कारला सीएनजी कारमध्ये बदलण्याचा विचार करत असाल तर ओईएम प्रमाणित डिलरकडूनच अधिकृत सीएनजी किट घ्या. स्थानिक किंवा नॉन ब्रँडेड किट बसवण्याचे टाळा. स्वस्त असले तरी हे कीट वाहनाची आणि तुमची सुरक्षा धोक्यात घालू शकतात.

(टीव्हीएसच्या ‘या’ ई स्कुटरला लोकांची प्रचंड पसंती, एका दिवसात २०० स्कुटर्सची डिलिव्हरी)

२) फिल्टरची नियमितपणे तपासणी करा आणि त्यास स्वच्छ करा

सीएनजी कारची देखभाल करताना एअर फिल्टरकडे लक्ष देणे गरजेचे आहे. एअर फिल्टर धूळ, घाण आणि इतर घटक इंजिनमध्ये जाण्यापासून रोखते आणि इंजिन सुरळीतरित्या कार्य करत आहे की नाही याची खात्री करते. स्वच्छ एअर फिल्टर वाहनाच्या इंधन कार्यक्षमतेते सुधारणा देखील करते. म्हणून नियमित अंतराने एअर फिल्टर तपासणे आणि ते स्वच्छ करणे गरजेचे आहे.

३) टँकमध्ये लिक आहे की नाही हे तपासा

सीएनजी हे पेट्रोल आणि डिझेलप्रमाणेच ज्वलनशील आहे. टँकमध्ये छोटेसे लिक वाहन आणि त्याचा मालकाच्या जिवाला धोकादायक ठरू शकते. म्हणून कारची देखभाल करताना कुठे लिक आहे की नाही हे तपासा. नॅचरल गॅस रंगहीन आणि गंधहीन असली तरी तुम्ही लिकेज तपासू शकता. लिक ओळखू येण्यासाठी काही फ्युअल मार्केटिंग कंपन्यांनी आपल्या सीएनजीला एक तीक्ष्ण (पंजंट) वास दिलेला आहे. असा वास आल्यास तात्काळ सीएनजी मेकॅनिकला बोलवा.

(होंडा, ग्लॅमरला मोठे आव्हान; बजाजने लाँच केली पल्सरची कार्बन फायबर एडिशन, जाणून घ्या किंमत)

४) स्पार्क प्लग नियमित तपासा

स्पार्क प्लग हे कारच्या इंजिनचा सर्वात महत्वाचा घटक आहे. स्पार्क प्लग सीएनजीला अग्नी देण्यासाठी जबाबदार असतात. स्पार्क प्लग व्यवस्थीत काम करत आहे की नाही हे तपासले पाहिजे, गरज असल्यास ते बदलले पाहिजे. नेहमी अधिकृत डिलरकडूनच सीएनजीला सुसंगत असे उच्च दर्जाचे स्पार्क प्लग खरेदी केले पाहिजे. कमी गुणवत्तेचे आणि स्वस्त स्पार्क प्लग घेऊन सुरक्षेशी तडजोड करू नये. कमी गुणवत्तेच्या स्पार्क प्लगने आग लागू शकते किंवा इंजिनला नुकसान होऊ शकते. दर सहा महिन्यांनी स्पार्क प्लग बदलण्याचा सल्ला दिला जातो.