उन्हाळ्यानंतर पावसाळा हा गारवा घेऊन येतो, पण त्यासोबत काही समस्या देखील तो निर्माण करतो. वाहन चालकांना पावसाळ्यात वाहन चालवताना भरपूर त्रास होतो. रस्त्यावर साचलेले पाणी आणि खड्ड्यांमुळे वाहनाचे नुकसान तर होतेच, शिवाय चालकाची सुरक्षाही धोक्यात पडते. या पार्श्वभूमीवर पावासाळ्यात सुरक्षित प्रवासासाठी काही उपाय तुम्हाला सांगत आहोत. हे उपाय दुचाकी चालकांना पावसाळ्यात कुठलीही समस्या न होता वाहन चालवण्यात फायदेशीर ठरू शकतात.

१) स्मार्ट व्हा

पावसाळ्यात तुम्हाला ऑफिस जावे लागत असेल तर कमी खड्डे असलेल्या रस्त्यांची निवड करा, तसेच ज्या रस्त्यांवर पाणी कमी साचते अशा रस्त्यातून प्रवास करा. पाणी साचलेल्या रस्त्यातून वाहन चालवल्यास ते बंद होण्याची शक्यता असते. त्यामुळे समस्या निर्माण करणारे रस्ते टाळा.
या शिवाय पावसाळ्यात वाहतूक कोंडीमध्ये अडकू नये यासाठी तुम्ही गुगल मॅपचा वापर करू शकता. कमीत कमी वाहतूक असलेल्या रस्त्यांची माहिती तुम्हाला या अ‍ॅपमधून मिळू शकते. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्हाला पावसाळ्यात देखील वेळेत तुमच्या कार्यालयात पोहचण्यात मदत होऊ शकते.

(वेळ दवडू नका, कार घेण्याचे स्वप्न लवकर पूर्ण करा, पुढील वर्षी ‘या’ कारणांमुळे वाढणार किंमती)

२) स्कुटर, बाईकची सर्व्हिसिंग

पावसाळ्यामध्ये वाहनाची सर्व्हिसिंग करणे गरजेचे आहे. पावसाळ्यात बाईक चालवताना त्रास होऊ नये, यासाठी तिची सर्व्हिसिंग करून ठेवा. बाईक चांगल्या स्थितीत असल्यास ती रस्त्यावरील पाणी आणि खड्ड्यांपासून सुरक्षित राहील.

३) ब्रेकिंग सिस्टिम

पावसाळ्यात बाईकचे ब्रेक चेक केले पाहिजे. सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने ते खूप महत्वाचे आहे. पावसाळ्यात बाईक आणि रस्ते ओले होतात. त्यामुळे प्रवास करताना ब्रेक प्रभावीपणे काम करत नाही. म्हणून सर्व्हिसिंग करताना बाईकच्या मागील आणि पुढील भागातील व्हिलमध्ये नवे ब्रेक शू लावा. या शिवाय ब्रेकिंग सिस्टिमची ग्रिसिंग आणि ऑयलिंग बरोबर केली आहे की नाही ते चेक करून ब्रेक नीट काम करतो आहे की नाही हे तपासून घ्या. ब्रेकने प्रभावीपणे काम केल्यास पावसाळ्यात तुमचा प्रवास अधिक सुरक्षितपणे होऊ शकतो.

(सेकंड हँड बाईक घेण्यासाठी घाई करू नका, आधी ‘या’ गोष्टी तपासा, नुकसान टळेल)

४) टायरची निवड

पावसाळ्यात टायर ओले झाल्यास बाईकच्या टायरची पकड कमी होते. म्हणून आपल्या वाहनाचे टायर चेक करा. जर टायर घासलेले असतील तर लवकरात लवकर ते बदलून चागली ग्रिप असलेले टायर बाईकला लावा. याने ओल्या रस्त्यांवर टायरची ग्रिप चांगली राहील, टायर रस्त्यांवरून घसरणार नाही आणि अपघात टळेल.

Story img Loader