Top 10 best-selling cars in June 2024 : जून २०२४ मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या कार्सची यादी येथे दिली आहे. या यादीमध्ये टाटा मोटर्सने ‘टाटा पंच’सह पुन्हा अव्वल स्थान पटकावले, तर मारुती सुझुकी स्विफ्ट दुसऱ्या स्थानावर आहे. गेल्या महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत वाढीचा दर स्थिर होता. वाहनांच्या विक्रीत अडथळा येऊनही, टाटा जून २०२४ मध्ये सर्वोच्च स्थानी पोहोचण्यात यशस्वी झाले आहे. टाटा पंचने मे महिन्यात विक्रीवर राज्य करणाऱ्या मारुती सुझुकी स्विफ्टला मागे टाकत सर्वाधिक विक्री होणारे वाहन होण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

टाटा मोटर्स जून २०२३ मध्ये पंच च्या १०,९९० युनिट्सची विक्री केली होती. जून २०२४ मध्ये टाटा पंचाच्या १८२३८ टक्के युनिटची विक्री केली. टाटा मोटर्सने जून २०२३ च्या तुलनेत जून २०२४ मध्ये टाटा पंचाच्या ६६ टक्के युनिट्सची अधिक विक्री केली.

मारुती सुझुकीने जून २०२३ मध्ये स्विफ्टच्या १५९५१ युनिट्सची विक्री केली होती. जून २०२३ च्या तुलनेत जून २०२४ मध्ये मारुती सुझुकीने स्विफ्टची टक्के अधिक युनिट्सची विक्री केली. जून २०२४ मध्ये स्विफ्टच्या १६४२२ युनिट्सची विक्री केली

ह्युंदाईने क्रेटासह या यादीमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे, कारण जून २०२४मध्ये १६२९३ युनिट्स विकून आणि १३ टक्क्यांनी वार्षिक विक्रीमध्ये वाढ नोंदवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा -पावसाळ्यात कारच्या विंडस्क्रीनवर वाफ जमा होतेय? मग एसी वापरण्याची ‘ही’ सोपी ट्रिक घ्या जाणून

जून २०२४ मध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारमध्ये मारुती सुझुकीचे वर्चस्व

एर्टिगा, बलेनो, वॅगन आर, डिझायर आणि ब्रेझासह मारुती सुझुकीने या यादीमध्ये अनुक्रमे पुढील पाच स्थान मिळवले आहेत. कार निर्मात्याने वॅगन आर व्यतिरिक्त, त्या सर्वांसह वर्षभराच्या विक्रीत चांगली वाढ पाहिली आहे. वॅगन आरच्या वार्षिक विक्रीमध्ये २१ टक्के घट झाली. मारुती सुझुकीच्या पाच मॉडेल्सपैकी, Ertiga ने वर्ष २०२४ मध्ये जून मध्ये १५९०२ युनिट्सची विक्री करून ८९ टक्के वार्षिक विक्री वाढ केली आहे.

महिंद्रा स्कॉर्पिओ आणि टाटा नेक्सॉन शेवटच्या दोन स्थानांवर आहेत पण टॉप १० यादीत स्थान मिळवले आहे. स्कॉर्पिओने महिंद्राच्या विक्रीत वाढ सुरूच ठेवली आहे, गेल्या महिन्यात १२,३०७ युनिट्सची विक्री केली आणि वार्षिक ४२ टक्के वाढ झाली, तर टाटा नेक्सॉनने जून २०२४ मध्ये विकल्या गेलेल्या टॉप १० वाहनांच्या यादीत स्थान मिळवूनही विक्री, १२०६६6 युनिट्सची नोंदणी करून १३ टक्क्यांनी घट नोंदवली.

हेही वाचा – तुमच्या गाडीमध्ये एअरबॅग आहे का? एअरबॅग वाचवू शकते तुमचा जीव; जाणून घ्या कसं?

जून २०२४ मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप १० कार्स

१) टाटा पंच – १८,२३८(जून २०२४)- १०,९९० (जून २०२३) – ६६% (वाढ)
२) मारुती सुझुकी स्विफ्ट – १६४२२ -(जून २०२४) – १५,९५५ (जून २०२३) – ३% (वाढ)
३ ) ह्युंदाईने क्रेटा – २६२९३ जून २०२४) – १४,४४७ (जून २०२३) – १३ % (वाढ)
४) मारुती सुझुकी अर्टिगा – १५,९०२ (जून २०२४)- ८,४२२ (जून २०२३) ८९%(वाढ)
५) मारुती सुझुकी बलेनो – १४,८९५ (जून २०२४) – १४,०४७ (जून २०२३) ६% (वाढ)
६) मारुती सुझुकी वॅगन आर – १३,७९० (जून २०२४) -१७,४८१ (जून २०२३) – २१ %(वाढ)
७) मारुती सुझुकी डिझायर १३,४२१ (जून २०२४) – ९,३२२ (जून २०२३) – ४४ % (वाढ)
८) मारुती सुझुकी ब्रेझा १३,१७२ (जून २०२४) – १०,५७८ (जून २०२३) २५ % (वाढ)
९) महिंद्रा स्कॉर्पिओ – १२३०७ (जून २०२४) – ८६४८ (जून २०२३) ४२ % (वाढ)
१०) टाटा नेक्सॉन -१२,०६६ (जून २०२४) – १३,८२७ (जून २०२३) -१३ % (वाढ)

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top 10 best selling cars in june 2024 tata punches its way to top snk
Show comments