इंधन दरवाढीचा फटका हा सर्वसामान्यांना बसत आहे. दररोज पेट्रोल डिझेलमधील होणारी वाढ चिंता वाढवणारी आहे. अशात भारताची राजधानी दिल्ली आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईत सध्या पेट्रोल डिझेलचे दर उच्चांक पातळीवर आहे. भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत टू व्हीलरधारकांची संख्या सर्वाधिक आहे. अशात आज आम्ही तुम्हाला इंधनाचा कमी वापर करणाऱ्या दहा बाईकविषयी सांगणार आहोत ज्या तुम्हाला वाढत्या इंधनदरापासून दिलासा देतील.

१. बजाज प्लाटिना १०० – ७२ – ६३,१३० रुपये
२. टिव्हीएस स्पोर्ट – ७० – ६३,९५० रुपये
३. बजाज प्लाटिना ११० – ७० -६९, २१६रुपये
४. बजाज सीटी ११० – ७० – ६६,२९८ रुपये
५. टिव्हीएस स्टार सिटी प्लस – ६८ – ७२,३०५रुपये
६. होन्डा एसपी १२५ – ६५ -८२,४८६ रुपये
७. हिरो एचफ डिलक्स – ६५ – ५९, ८९० रुपये
८. टिव्हीएस रेडॉन – ६५ ५९,९२५ रुपये
९. होन्डा सीडी ११० – ६५ ७०. ३१५ रुपये
१०. हिरो स्प्लेंडर प्लस – ६० ७२,७२८ रुपये

New procedure regarding online booking by LPG Company to customers
आता ‘ओटीपी’ सांगितल्याशिवाय गॅस सिलेंडर मिळणारच नाही; कशी आहे नवीन प्रक्रिया?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
dark chocolate cinnamon coffee and green tea enough to reduce blood sugar
Blood Sugar : ग्रीन टी, डार्क चॉकलेट, दालचिनीमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते का? काय खरं काय खोटं? जाणून घ्या तज्ज्ञांकडून
peoples lives will be saved due to the remote operated device
खरंच आता कुणी पाण्यात बुडणार नाही? रिमोटवर चालणाऱ्या यंत्रामुळे वाचणार लोकांचा जीव, VIDEO होतोय व्हायरल
Itishri Expanding Horizons and Obstructing Frames
इतिश्री: विस्तारणारं क्षितिज आणि अडवणाऱ्या चौकटी
Bajaj Triumph New Speed 400
Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी येतेय ‘ही’ नवीन बाईक, जबरदस्त लूक, ३३४ सीसी इंजिन अन्…; जाणून घ्या किंमत, फीचर्स
heart attack risk goes down by drinking tea regularly | read how does tea help heart health
Heart Attack & Tea : रोज चहा प्यायल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो का? संशोधनातून समोर आली माहिती; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Healthy Foods for Your Liver
लिव्हर खराब होण्याचा धोका वाटतोय? लिव्हरमधील फॅट्स झपाट्याने काढून टाकतात ‘हे’ आठ पदार्थ? सेवनाची पद्धत घ्या समजून…

(हे ही वाचा : उत्सूकता शिगेला पोहोचली, भारतात दाखल होतोहेत सर्वात स्वस्त ७ सीटर MPV कार, Ertiga-Innova ही विसरुन जाल!)

बजाज प्लाटिना १०० – मायलेज ७२ किलोमीटर प्रति लीटर

टॉप दहा बाइक्सपैकी बजाज प्लाटिना ही सर्वात चांगली मायलेज देणारी बाइक आहे. कमी इंधनाचा वापर करुन ही सर्वात जास्त मायलेज देते. या बाइकचा मायलेज दर ७२ किमी प्रति लीटर आहे. या बजाज प्लाटिनाचा ग्राफीक्स खूप हटके असून याला अलॉय व्हिल्स आहे. बाइकला एलइडी लाईट असून इलेक्ट्रीक स्टार्ट आहे. या बाइकचा पावरट्रेन 7.91 बीएचपी (Brake Horse Power) तयार करतात आणि याची शोरुम किंमत ६५९९४ रुपये आहे.

टिव्हीएस स्पोर्ट – मायलेज ७० किलोमीटर प्रति लीटर

टिव्हीएस स्पोर्ट बाइकची किंमत ६३,९०० आहे. 63,900. १०९सीसी इंजिनचा वापर करुन बाइक ८.१८ बीएचपी पीएफ पिक पावर तयार करते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ७० किलोमीटर प्रति लीटरचं मायलेज देते.

बजाज प्लाटिना ११० – मायलेज ७० किलोमीटर प्रति लीटर

या बाइक्सचे ग्राफिक्स खूप स्टायलिश आहे. ही बाइक शोरुममध्ये ६८,३५८ रुपयांपासून उपलब्ध आहे. ही बाइकसुद्धा टिव्हीएस स्पोर्ट बाइकसारखी ७० किलोमीटर प्रति लीटरचा मायलेज देते.

(हे ही वाचा : महिंद्राचा बाजारपेठेत नवा गेम, Maruti Jimnyचं खेळ संपविण्यासाठी नव्या अवतारात दाखल करतेय ‘ही’ लोकप्रिय कार, किंमत…)

बजाज सीटी ११० 110 – मायलेज ७० किलोमीटर प्रति लीटर

बजाज सीटी११० बाइकचे स्पोर्टी ग्राफिक्स आहे. या बाइकचं पावर इंजिन ८.६ बीएचपी (Brake Horse Power) तयार करतं. बजाज सीटी ११० ची किंमत ६६,९०० आहे. ही बाइकसुद्धा टिव्हीएस स्पोर्ट आणि बजाज प्लाटिना ११० बाइकसारखी ७० किलोमीटर प्रति लीटरचा मायलेज देते.

टिव्हीएस स्टार सिटी प्लस – मायलेज ६८ किलोमीटर प्रति लीटर

टिव्हीएस स्टार सिटी प्लस त्याच्या ड्युअल टोन मिरर, एलइडी DRLs,स्पोर्टी लूकमुळे आणखी आकर्षित दिसते. १०९.७ सीसी इंजिनचा वापर करुन सिटी प्लस ८.०८ बीएचपी (Brake Horse Power)तयार करते. ही बाइक ६८ किलोमीटर प्रति लीटरचं मायलेज देते. या बाइकची शोरुम किंमत ७२,३०५ आहे.