Safest Cars In India: देशात अनेक लोक कोणतीही कार घेताना त्याचा लूक पाहतात. मात्र, जितका आपण कारचा लूक पाहतो तितकेच त्या कारचे सेफ्टी फीचर्सही पाहतो. आता बहुतांश भारतीय ग्राहक नवीन कार खरेदी करताना त्यामधील सेफ्टी फीचर्स, एअरबॅग्सची माहिती घेतात. कारण कार चालवत असताना अपघात झाल्यास चांगले सेफ्टी फीचर्स कारमध्ये असल्यास तुमचा जीव वाचू शकतो. म्हणून कारचे सेफ्टी फीचर्स पाहणे खूप महत्वाचे असते. तुम्हालाही सुरक्षित कार घ्यायची असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी देशातील टॉप-१० सुरक्षित कारची माहिती घेऊन आलो आहोत. चला तर पाहूया कोणत्या आहेत, या कार…
‘या’ आहेत देशातील सर्वात सुरक्षित कार
- Volkswagen Virtus: चाचणी एजन्सी ग्लोबल NCAP ने चाचणीमध्ये ५ स्टार सुरक्षा रेटिंग दिले आहे. त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ११.४७ लाख रुपये आहे.
- Skoda Slavia: कारला ग्लोबल NCAP ने क्रॅश टेस्टिंगमध्ये ५ स्टार रेटिंग दिले आहे. ही एक प्रीमियम मध्यम आकाराची सेडान कार आहे. त्याची सुरुवातीची किंमत ११.३९ लाख रुपये आहे.
- Volkswagen Taigun: ग्लोबल NCAP ने देखील याला ५ स्टार सुरक्षा रेटिंग दिले आहे. त्याची सुरुवातीची किंमत ११.६१ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
(हे ही वाचा : महिंद्राची कमाल! ड्रायव्हर झोपला तर लगेचच वाजणार अलार्म, ‘या’ दोन SUV मध्ये मिळणार ‘हे’ फीचर)
- Skoda Kushaq: याला ग्लोबल NCAP कडून ५ स्टार सुरक्षा रेटिंग देखील मिळाले आहे. त्याची सुरुवातीची किंमत ११.५९ लाख रुपये (एक्स-शोरूम)आहे.
- Mahindra Scorpio-N: ही महिंद्राची एक शक्तिशाली आणि लोकप्रिय SUV आहे. याला ग्लोबल NCAP कडून ५ स्टार सुरक्षा रेटिंग देखील मिळाले आहे. त्याची किंमत १२.७४ लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.
महिंद्रा XUV300 आणि Mahindra XUV700 यांचाही टॉप-१० कारमध्ये समावेश आहे. दोघांना ५ स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. याशिवाय, टॉप-१० सर्वात सुरक्षित कारमध्ये टाटा पंच, टाटा अल्ट्रोझ आणि टाटा नेक्सॉन या तीन टाटा कार आहेत. या तिघांना ग्लोबल NCAP कडून ५ स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. त्यापैकी पंच ही सर्वात स्वस्त कार आहे, तिची किंमत ६ लाख रुपयांपासून सुरू होते.