Top 10 Cars in March: मार्च महिन्यातील कारच्या विक्रीचे आकडे आपल्यासमोर आले आहेत. कार उत्पादकांसाठी हा महिना चांगला आहे आणि बहुतेक कंपन्यांनी सकारात्मक वाढ नोंदवली आहे. मात्र, टॉप १० कारच्या यादीत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. उर्वरित महिन्यांप्रमाणे, मार्च २०२३ मध्ये देखील, १० पैकी ७ सर्वाधिक विक्री झालेल्या कार मारुती सुझुकीच्या होत्या. मारुतीच्या लोकप्रिय हॅचबॅकने गेल्या महिन्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली. बलेनो, अल्टो आणि वॅगनआर सारख्या मॉडेल्सना मागे टाकले. मार्चमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप १० कारची यादी पाहूया.

Swift ने मारली बाजी

मारुती सुझुकी स्विफ्ट ही गेल्या महिन्यात सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. मार्च २०२३ मध्ये १७,५५९ युनिट्सची विक्री झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर मारुती सुझुकी वॅगनआर होती, ज्यांच्या १७,३०५ युनिट्सची विक्री झाली.

Mumbai Kurla Bus Accident marathi news
विश्लेषण : बेस्टच्या दुर्दशेला जबाबदार कोण? कंत्राटी गाड्या आणि चालकांचा प्रयोग कसा फसला?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
Yamaha NMax 125 Tech Max scooter Details
NMax 125 Scooter :Yamaha ने सादर केली नवीन टेक मॅक्स स्कूटर, बाईकला टक्कर देणारे जबरदस्त फीचर्स; पण भारतात लाँच होणार का?
11 December Latest Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price :तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? एक लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
champions of the earth award madhav gadgil
माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांचा जीवनगौरव
jsw e cars marathi news
‘जेएसडब्ल्यू‘कडून सात लाख ई-मोटार निर्मितीचे उद्दिष्ट, प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून मंजुरी
MG Select shares first look of mg cyberster with electric cissor doors
महागड्या स्पोर्ट्स कारला देणार टक्कर! ‘या’ कंपनीने नव्याकोऱ्या कारचा पहिला लूक केला शेअर, इलेक्ट्रिक डोअर्ससह मिळतील खास फिचर्स

Brezza ही सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही

फेब्रुवारी महिन्याप्रमाणे, मार्चमध्येही मारुती सुझुकी ब्रेझा ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही ठरली आहे. मार्च २०२३ मध्ये या कारच्या १६,२२७ युनिट्सची विक्री झाली आहे. ब्रेझानंतर कंपनीची मारुती सुझुकी बलेनो चौथ्या क्रमांकावर आहे. त्याची १६,१६८ युनिट्स विकली गेली.

(हे ही वाचा : टाटाच्या ‘या’ ९ सीटर कारसमोर Jimny-Thar ही फेल, फीचर्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क )

Nexon-Creta चा कमाल

गेल्या महिन्यात टाटा नेक्सॉन पाचव्या तर ह्युंदाई क्रेटा सहाव्या क्रमांकावर होती. या दोन्ही SUV ने मार्च २०२३ मध्ये अनुक्रमे १४,७६९ आणि १४,०२६ युनिट्स विकल्या आहेत.

Maruti Dzire एकमेव सेडानची बाजी

मारुती सुझुकी डिझायर ही टॉप १० सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये एकमेव सेडान कार आहे. गेल्या महिन्यात या कारच्या १३,३९४ युनिट्सची विक्री झाली होती. मारुती सुझुकी Eeco आठव्या क्रमांकावर आहे, ज्याने गेल्या महिन्यात ११,९९५ युनिट्सची विक्री केली आहे.

पंच आणि ग्रँड विटारा यांचाही टॉप 10 मध्ये समावेश

टाटा पंच टॉप १० यादीत कायम आहे. मार्चमध्ये ते नवव्या स्थानावर आहे. १०,८९४ युनिट्सची विक्री नोंदवली. ग्रँड विटाराने प्रथमच टॉप १० मध्ये प्रवेश केला आणि गेल्या महिन्यात १०,०४५ युनिट्सची विक्री केली.

(हे ही वाचा : Second Hand वाहनांच्या बाजारात ‘या’ कारला तुफान मागणी, किंमत फक्त २.५ लाख, मायलेज २२.३८ किमी )

मार्चमधील टॉप 10 कारची यादी

  • मारुती सुझुकी स्विफ्ट – १७,५५९ युनिट्स
  • मारुती सुझुकी वॅगनआर – १७,३०५ युनिट्स
  • मारुती सुझुकी ब्रेझा – १६,२२७ युनिट्स
  • मारुती सुझुकी बलेनो – १६,१६८ युनिट्स
  • टाटा नेक्सॉन – १४,७६९ युनिट्स
  • ह्युंदाई क्रेटा – १४,०२६ युनिट्स
  • मारुती सुझुकी डिझायर – १३,३९४ युनिट्स
  • मारुती सुझुकी Eeco – ११,९९५ युनिट्स
  • टाटा पंच – १०,८९४ युनिट्स
  • मारुती सुझुकी ग्रँड विटारा – १०,०४५ युनिट्स

Story img Loader