Best Selling Cars: भारतात वाहनांचं मोठं हब आहे. दरवर्षी भारतीय बाजारात लाखो कार विकल्या जातात. कार विक्रीच्या बाबतीत मारूती सुझुकीचा आकडा सर्वाधिक आहे. ही कंपनी आपल्या ब्रँडच्या सर्वाधिक गाडया विकते. मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार विकणारी कंपनी आहे. त्यानंतर कार विक्रीच्या बाबतीत ह्युंदाई दुसऱ्या स्थानावर तर टाटा मोटर्स तिसऱ्या स्थानावर होती. याचसोबत कोणत्या वाहनांना ऑगस्ट २०२३ मध्ये ग्राहकांनी अधिक पसंती दिली? भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप २५ कारची यादी बघा. पाहा कोणत्या कारनं मारली बाजी…
(हे ही वाचा : BMW iX, Jaguar I-Pace चा खेळ संपणार? देशात दाखल झाली Mercedes-Benz ची तिसरी इलेक्ट्रिक SUV कार, किंमत… )
टॉप-२५ बेस्ट सेलिंग कार (ऑगस्ट २०२३)
१. मारुती स्विफ्ट – १८,६५३ युनिट्स विकल्या गेल्या
२. मारुती बलेनो – १८,५१६ युनिट्स विकल्या गेल्या
३. मारुती वॅगन आर – १५,५७८ युनिट्स विकल्या
४. मारुती ब्रेझा – १४,५७२ युनिट्स विकल्या गेल्या
५. टाटा पंच – १४,५२३ युनिट्स विकल्या
६. ह्युंदाई क्रेटा – १३,८३२ युनिट्स विकल्या गेल्या
७. मारुती डिझायर- १३,२९३ युनिट्स विकल्या
८. मारुती एर्टिगा- १२,३१५ युनिट्स विकल्या
९. मारुती फ्रॉन्क्स- १२,१६४ युनिट्स विकल्या
१०. मारुती इको – ११,८५९ युनिट्स विकल्या
११. मारुती ग्रँड विटारा – ११,८१८ युनिट्स विकल्या गेल्या
१२. ह्युंदाई व्हेन्यू – १०,९४८ युनिट्स विकल्या गेल्या
१३. किया सेल्टोस – १०,६९८ युनिट्स विकल्या गेल्या
१४. महिंद्रा स्कॉर्पिओ एन + क्लासिक- ९,८९८ युनिट्स विकल्या गेल्या
१५. मारुती अल्टो- ९,६०३ युनिट्स विकल्या
१६. टाटा टियागो- ९,४६३ युनिट्स विकल्या गेल्या
१७. महिंद्रा बोलेरो- ९,०९२ युनिट्स विकल्या
१८. टोयाटो इनोव्हा क्रिस्टा + हायक्रॉस – ८,६६६ युनिट्स विकल्या गेल्या
१९. टाटा नेक्सॉन – ८,०४९ युनिट्स विकल्या
२०. टाटा अल्ट्रोज – ७,८२५ युनिट्स विकल्या
२१. ह्युंदाई एक्स्टर – ७,४३० युनिट्स विकल्या
२२. ह्युंदाई ग्रँड आय टेन निऑस – ७,३०६ युनिट्स विकल्या गेल्या
२३. महिंद्रा XUV700 – ६,५१२ युनिट्स विकल्या गेल्या
२४. महिंद्रा थार- ५,९५१ युनिट्स विकल्या गेल्या
२५. महिंद्रा XUV300 – ४,९९२ युनिट्स विकल्या