हॅचबॅक कार्सनंतर कार क्षेत्रातील सेडान सेगमेंटला सर्वाधिक पसंती दिली जाते, ज्यामुळे या सेगमेंटच्या कार उत्तम फीचर्स आणि मायलेजसह मिड रेंजमध्ये उपलब्ध आहेत. जर तुम्ही कमी बजेटमध्ये सेडान कार घेण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्या उपयोगाची ठरू शकते.

या सेगमेंटमधील टॉप ३ सेडानचे डिटेल्स इथे जाणून घ्या ज्या त्यांच्या कमी किमती, मायलेज डिझाईन आणि फीचर्समुळे पसंत केल्या जातात. याच्या किंमतीपासून ते इंजिनचे फीचर्स, मायलेज आणि संपूर्ण तपशील जाणून घ्या..

Tata Tigor: टाटा मोटर्सने बाजारात आणलेल्या सहा ट्रिमसह टाटा टिगोर ही या यादीतील सर्वात स्वस्त सेडान कार आहे. या सेडानमध्ये ११९९ सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन १.२ लिटर तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, जे ८६ PS पॉवर आणि ११३ Nm पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने या इंजिनसोबत ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन दिले आहे.

मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही टाटा टिगोर १९.२ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

टाटा टिगोरची सुरुवातीची किंमत ६ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे, जी त्याच्या टॉप व्हेरिएंटवर जाते तेव्हा ती ८.५९ लाखांपर्यंत जाते.

आणखी वाचा : केवळ १० हजारात मिळतेय Hero Splendor Plus, जाणून घ्या काय आहे ऑफर?

Hyundai Aura: कंपनीने बाजारात आणलेल्या पाच ट्रिमसह Hyundai Aura या यादीतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात कमी किमतीची सेडान आहे.
या सेडानच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे तर कंपनीने यामध्ये ११९७ सीसीचे १.२ लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन ८३ PS पॉवर आणि ११४ Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.

मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही Hyundai Aura 21 kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

Hyundai Aura ची सुरुवातीची किंमत ६.०९ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे जी टॉप व्हेरियंटवर जाताना ८.८७ लाखांपर्यंत जाते.

आणखी वाचा : Tata Tiago XE CNG Finance Plan: Tata Tiago चे CNG व्हेरिएंट केवळ ७१ हजारात, वाचा ऑफर

Maruti Dzire: या यादीत मारुती डिझायर ही त्यांच्या कंपनीची सर्वात स्वस्त आणि तिसरी स्वस्त सेडान आहे, जी चार ट्रिमसह बाजारात दाखल झाली आहे.

मारुती डिझायरमध्ये ११९७ cc चे १.२ लीटर ड्युअल जेट पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन ९० PS पॉवर आणि ११३ Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.

मारुती डिझायरच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही डिझायर २३.२६ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

मारुती डिझायरची सुरुवातीची किंमत ६.२४ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे, जी त्याच्या टॉप व्हेरिएंटवर जाते तेव्हा ती ९.१८ लाखांपर्यंत जाते.

Story img Loader