दुचाकी क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांनी जुलै २०२२ मध्ये त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईकच्या विक्रीचे आकडे प्रसिद्ध केले आहेत. या आकडेवारीनुसार ओकिनावा, टीव्हीएस आणि बजाज सारख्या कंपन्यांनी या महिन्यात खूप चांगला नफा कमावला आहे.

जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्याआधी जुलै २०२२ मध्ये देशातील सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप ३ इलेक्ट्रिक स्कूटरचा संपूर्ण विक्री अहवाल येथे जाणून घ्या, जेणेकरून तुम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकाल.

Tire killer is going to be tested in three important areas of Thane railway station area
स्थानक परिसरात लवकरच ‘टायर किलर’
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Monopole erection to keep power system running smoothly
वीजयंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी मोनोपोल
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
Rizwan Sajan Success Story
Success Story: १६ व्या वर्षी उदरनिर्वाहासाठी विकले दूध, आता आहेत दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीय
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
buldhana vidarbha
निर्यात क्षेत्रात ‘हा’ जिल्हा पश्चिम विदर्भात अव्वल; ४६५ कोटींची निर्यात

Okinawa Praise Pro
Okinawa Praise Pro ही तिच्या कंपनीसह जुलै महिन्यात भारतातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर बनली आहे. कंपनीने जुलै महिन्यात या स्कूटरच्या १०,०४१ युनिट्सची विक्री केली आहे, तर गेल्या वर्षी जुलै २०२१ मध्ये कंपनी या स्कूटरच्या फक्त २,५८० युनिट्सची विक्री करू शकली होती.

Okinawa Praise Co च्या रेंजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर १७० किमीची रेंज देते. या स्कूटरची सुरुवातीची किंमत ८७,५९३ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

आणखी वाचा : केवळ ३५ हजारात खरेदी करा Bajaj Avenger Cruise 220, जाणून घ्या काय आहे ऑफर?

TVS iQube
TVS iQube ही त्यांच्या कंपनीची एकमेव इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जी आता जुलै महिन्यात देशातील दुसरी सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक स्कूटर बनली आहे. TVS मोटर्सने जुलै महिन्यात या iCube च्या ६,३०४ युनिट्सची विक्री केली आहे, ज्यामुळे या इलेक्ट्रिक स्कूटरने मोठी उडी मारून टॉप ३ मध्ये स्थान मिळवले आहे.

TVS iCube च्या रेंजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही इलेक्ट्रिक स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ७५ किमीची रेंज देते. या स्कूटरची सुरुवातीची किंमत १.१२ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे, जी टॉप व्हेरिएंटवर जाताना १.२० लाख रुपयांपर्यंत जाते.

आणखी वाचा : फक्त ९ हजारांच्या डाउन पेमेंटवर खरेदी करा ६४ kmpl मायलेजची TVS Jupiter

Bajaj Chetak
बजाज चेतक ही बजाज ऑटोची एकमेव इलेक्ट्रिक स्कूटर आहे जिने जुलै महिन्यात चांगली कामगिरी केली आहे. कंपनीने जुलै २०२२ मध्ये या इलेक्ट्रिक स्कूटरच्या ३,००२ युनिट्सची विक्री केली आहे. या विक्रीमुळे टॉप ५ मधून बाहेर पडलेल्या या स्कूटरने टॉप ३ मध्ये स्थान मिळवून तिसरे स्थान पटकावण्यात यश मिळवले आहे.

बजाज चेतकच्या ड्रायव्हिंग रेंजबद्दल, कंपनीचा दावा आहे की ही इलेक्ट्रिक स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ९५ किमी (इको मोड) ची रेंज देते. या स्कूटरची सुरुवातीची किंमत १,३४,८१४ रूपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

जुलै महिन्यात या टॉप ३ सर्वाधिक पसंतीच्या इलेक्ट्रिक स्कूटरनंतर चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर बोलायचे झाल्यास, Ather Energy ची Ather 450 स्कूटर चौथ्या क्रमांकावर आहे, जिच्या २,७१४ युनिट्सची जुलै महिन्यात कंपनीने विक्री केली आहे. यानंतर, ओकिनावाची रिज प्लस इलेक्ट्रिक स्कूटर पाचव्या क्रमांकावर आहे, ज्याचे १,३०२ युनिट्स कंपनीने जुलै २०२२ मध्ये विकले होते.

Story img Loader