Top 3 best-selling Tata cars in March 2023: टाटा मोटर्सने मार्च २०२३ मध्ये ४४,०४४ कार विकल्या आहेत, जे मार्च २०२२ मध्ये विकल्या गेलेल्या ४२,२९३ युनिट्सपेक्षा ४ टक्के अधिक आहे. या काळात कंपनीची नेक्सॉन ही सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. Nexon ने मार्च २०२३ मध्ये १४,७६९ युनिट्सची विक्री केली आहे, जी मागील वर्षीच्या (मार्च २०२२) पेक्षा ३ टक्के अधिक आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये, कार निर्मात्याने त्यातील १३,९१४ युनिट्स विकल्या होत्या. टाटा नेक्सॉन ही एक अतिशय लोकप्रिय एसयूव्ही आहे. नेक्सॉनला ग्लोबल NCAP कडून ५-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. ही SUV पेट्रोल आणि डिझेल इंजिन व्हर्जन तसेच इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे.
Tata Punch
टाटा पंचने खूप वेगाने लोकप्रियता मिळवली आहे. लाँच होऊन जवळपास दीड वर्ष झाले असतील पण याने आधीच टॉप-५ विकल्या जाणार्या SUV मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. एवढेच नाही तर सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप-१० कारमध्ये टाटा पंचचाही समावेश आहे. मार्च २०२३ मध्ये १०,८९४ युनिट्सची विक्री झाली, तर गेल्या वर्षी (२०२२) मार्चमध्ये १०,५२६ युनिट्सची विक्री झाली. म्हणजेच, त्याची विक्री वार्षिक आधारावर सुमारे ३ टक्क्यांनी वाढली आहे. यात १.२ लीटर NA पेट्रोल इंजिन आहे.
(हे ही वाचा : आली रे आली! देशात नवी Lamborghini कार दाखल, स्पीड पाहून व्हाल थक्क, किंमत… )
Tata Tiago
टाटा टियागो ही कंपनीची तिसरी सर्वाधिक व्हॉल्यूम जनरेट करणारी कार आहे. गेल्या महिन्यात (मार्च २०२३) या एंट्री-लेव्हल हॅचबॅक कारच्या ७,३६६ युनिट्सची विक्री झाली, तर गेल्या वर्षी (२०२२) मार्चमध्ये ४,००२ युनिट्सची विक्री झाली. त्याची विक्री वार्षिक आधारावर ८४ टक्क्यांनी वाढली आहे. यात १.२-लीटर पेट्रोल इंजिन (८६PS/११३Nm) आहे, जे ५-स्पीड मॅन्युअल आणि ५-स्पीड AMT गिअरबॉक्स पर्यायांसह येते. यामध्ये सीएनजीचा पर्यायही उपलब्ध आहे.