Top 3 best-selling Tata cars in March 2023: टाटा मोटर्सने मार्च २०२३ मध्ये ४४,०४४ कार विकल्या आहेत, जे मार्च २०२२ मध्ये विकल्या गेलेल्या ४२,२९३ युनिट्सपेक्षा ४ टक्के अधिक आहे. या काळात कंपनीची नेक्सॉन ही सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. Nexon ने मार्च २०२३ मध्ये १४,७६९ युनिट्सची विक्री केली आहे, जी मागील वर्षीच्या (मार्च २०२२) पेक्षा ३ टक्के अधिक आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये, कार निर्मात्याने त्यातील १३,९१४ युनिट्स विकल्या होत्या. टाटा नेक्सॉन ही एक अतिशय लोकप्रिय एसयूव्ही आहे. नेक्सॉनला ग्लोबल NCAP कडून ५-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. ही SUV पेट्रोल आणि डिझेल इंजिन व्हर्जन तसेच इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Tata Punch

टाटा पंचने खूप वेगाने लोकप्रियता मिळवली आहे. लाँच होऊन जवळपास दीड वर्ष झाले असतील पण याने आधीच टॉप-५ विकल्या जाणार्‍या SUV मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. एवढेच नाही तर सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप-१० कारमध्ये टाटा पंचचाही समावेश आहे. मार्च २०२३ मध्ये १०,८९४ युनिट्सची विक्री झाली, तर गेल्या वर्षी (२०२२) मार्चमध्ये १०,५२६ युनिट्सची विक्री झाली. म्हणजेच, त्याची विक्री वार्षिक आधारावर सुमारे ३ टक्क्यांनी वाढली आहे. यात १.२ लीटर NA पेट्रोल इंजिन आहे.

(हे ही वाचा : आली रे आली! देशात नवी Lamborghini कार दाखल, स्पीड पाहून व्हाल थक्क, किंमत… )

Tata Tiago

टाटा टियागो ही कंपनीची तिसरी सर्वाधिक व्हॉल्यूम जनरेट करणारी कार आहे. गेल्या महिन्यात (मार्च २०२३) या एंट्री-लेव्हल हॅचबॅक कारच्या ७,३६६ युनिट्सची विक्री झाली, तर गेल्या वर्षी (२०२२) मार्चमध्ये ४,००२ युनिट्सची विक्री झाली. त्याची विक्री वार्षिक आधारावर ८४ टक्क्यांनी वाढली आहे. यात १.२-लीटर पेट्रोल इंजिन (८६PS/११३Nm) आहे, जे ५-स्पीड मॅन्युअल आणि ५-स्पीड AMT गिअरबॉक्स पर्यायांसह येते. यामध्ये सीएनजीचा पर्यायही उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top 3 best selling tata cars in march 2023 tata motors all four suv offerings nexon punch harrier and safari recorded their highest ever annual sales pdb
Show comments