देशाच्या ऑटो सेक्टरमध्ये, कार सेगमेंट असो की बाईक सेगमेंट, कमी किमतीच्या वाहनांना सर्वाधिक मागणी राहते. ज्यामध्ये आज आम्ही देशातील सर्वात कमी किमतीच्या गाड्यांबद्दल बोलत आहोत ज्यांना मोठ्या मायलेजसाठी प्राधान्य दिले जाते.
जर तुम्हालाही कमीत कमी बजेटमध्ये चांगली कार घ्यायची असेल, तर येथे जाणून घ्या या टॉप ३ कारचे डिटेल्स… ज्या तुम्हाला ४ लाखांच्या बजेटमध्ये मिळतील. त्यांच्या किंमतीशिवाय या कार त्यांच्या मायलेजसाठीही ओळखल्या जातात.
Maruti Alto 800
मारुती अल्टो 800 ही या विभागातील तसंच देशातील सर्वात कमी किमतीची कार आहे. तिच्या किंमतीव्यतिरिक्त अल्टोला मायलेजसाठी देखील पसंती दिली जाते.
Maruti Alto 800 ची सुरुवातीची किंमत ३.३९ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे जी टॉप व्हेरिएंटवर ५.०३ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पर्यंत जाते.
या कारमध्ये ७९६ सीसी तीन सिलेंडर इंजिन आहे. हे ०.८ लिटर पेट्रोल इंजिन ४८ PS पॉवर आणि ६९ Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.
मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही Alto 800 कार २२.०५ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.
आणखी वाचा : मोठी मायलेज देणारी Bajaj Platina केवळ १० हजारांच्या बजेटमध्ये, वाचा ऑफर
Datsun Redi Go
Datsun redi GO ही या सेगमेंटमध्ये तसेच देशात विकली जाणारी दुसरी सर्वात स्वस्त कार आहे. किंमत आणि मायलेज व्यतिरिक्त ही कार फीचर्ससाठी देखील पसंत केली जाते.
Datsun redi GO ची सुरुवातीची किंमत ३.८४ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे जी टॉप व्हेरिएंटवर ४.९६ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पर्यंत जाते.
Datsun redi GO मध्ये ९९९ cc तीन सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन ५३.६४ बीएचपी पॉवर आणि ७२ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने या इंजिनसोबत ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन दिले आहे.
मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही कार २०.७१ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते आणि हे मायलेज ARAIO ने प्रमाणित केले आहे.
आणखी वाचा : मोठ्या फॅमिलीसाठी केवळ १ लाखाच्या बजेटमध्ये घरी घेऊन जा Maruti Eeco, वाचा ऑफर
Maruti Alto K10
Maruti Alto K10 ही त्याच्या कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे, जी कंपनीने पुन्हा एकदा नवीन अवतारात लॉंच केली आहे. किंमतीशिवाय ही कार मायलेज, डिझाईन आणि फीचर्ससाठी सुद्धा पसंत केली जाते.
Maruti Alto K10 ची सुरुवातीची किंमत ३.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे जी टॉप व्हेरिएंटवर ५.८३ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पर्यंत जाते.
या कारमध्ये ९९८ cc K सीरीज इंजिन आहे. हे इंजिन १ लिटर ड्युअल जेट पेट्रोल इंजिन ६७ पीएस पॉवर आणि ८९ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही मारुती अल्टो K10 २४.३९ kmpl चा मायलेज देते. हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.