Cheapest Electric Cars In India: एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत असतानाच, इलेक्ट्रिक कारला लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे. यामुळेच इलेक्ट्रिक कार्सच्या विक्रीत सुद्धा चांगलीच वाढ झाली आहे. वाढत्या चार्जिंग पायाभूत सुविधांमुळे, अधिकाधिक नवीन कार खरेदीदार इलेक्ट्रिक कार निवडताना दिसत आहे. पण इलेक्ट्रिक कारच्या महाग किमंतीमुळे लोकं अशा कार्स खरेदी करण्याचा विचार टाळत आहे. चला तर मग, आम्ही सांगतो तुम्हाला या सेगमेंटमधील ३ सर्वात स्वस्त कार्स.

PMV EaS-E

Devendra Fadnavis vs Sanjay Raut
“…अन्यथा आम्ही आमचं पुस्तक उघडू”, राऊतांचा महायुतीला इशारा; म्हणाले, “भाजपा मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांऐवजी…”
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी पुढच्या वर्षी भाऊबीजेपर्यंत वाट पाहावी लागणार? भाजपाने मांडली रोखठोक भूमिका
actress Shobitha Shivanna suicide
अभिनेत्री शोभिता आढळली मृतावस्थेत, राहत्या घरी संपवलं आयुष्य
Upcoming Tata Cars in India 2024 & 2025
Upcoming Tata Cars : पैसे तयार ठेवा, नवीन वर्षात टाटाच्या ‘या’ ३ जबरदस्त कार होणार लाँच; जाणून घ्या दमदार फिचर्स
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

जर भारतातील स्वस्त इलेक्ट्रिक कार विषयी सांगायचे झाल्यास, पहिले नाव PMV EaS-E आहे, जी मुंबई बेस्ड स्टार्टअप पर्सनल मोबिलिटी व्हेईकल (PMV इलेक्ट्रिक) ने सादर केली आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत सुमारे ४ ते ५ लाख रुपये आहे. पण ही एक मायक्रो इलेक्ट्रिक कार आहे ज्यामध्ये फक्त २ लोक बसू शकतात. या कारची लांबी फक्त २९१५mm आहे. कंपनीचा दावा आहे की, ही कार एका चार्जमध्ये १६० किलोमीटरची रेंज देते. ही कार चार्ज होण्यासाठी किमान ४ तास लागतात.

Tata Tiago EV

टाटा कंपनीची ही कारसुद्धा भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारपैकी एक आहे. MG Comet EV लाँच करण्यापूर्वी, ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार होती. ही कार १९.२ kWh आणि २४ kWh च्या बॅटरी पॅकसह येते. १९.२ kWh बॅटरी पॅक ६१ PS पॉवर आणि ११० Nm टॉर्क जनरेट करते. तर, २४ kWh बॅटरी पॅक ७५ PS पॉवर आणि ११४ Nm टॉर्क जनरेट करते. १९.२ kWh आणि २४ kWh बॅटरी पॅकची रेंज अंदाजे २५० किमी आणि ३१५ किमी आहे. हे डीसी फास्ट चार्जरसह येते. Tata Tiago EV ची किंमत ५ लाखांपासून सुरु होते.

हेही वाचा >> किंमत फक्त ४.९९ लाख, ६ लाख लोकांनी खरेदी केली जबरदस्त सेफ्टी असलेली ‘ही’ फॅमिली कार

MG Comet EV

ही कार भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारपैकी एक असून ही कार तीन दरवाज्यांसह येते. या मायक्रो-इलेक्ट्रिक हॅचबॅक कारमध्ये १७.३ kWh क्षमतेचा बॅटरी पॅक आहे, जे एका चार्जवर २३० किमीपर्यंतची रेंज देते. यामध्ये असलेली बॅटरी पॅक ४२ PS ची पॉवर आणि ११० Nm कमाल टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि Apple CarPlay सह १०.२५-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, १०.२५-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, कनेक्टेड कार तंत्रज्ञान, १२V पॉवर आउटलेट, USB चार्जिंग पोर्ट आणि कीलेस एंट्री यांसारखे फीचर्स आहेत. या कारची एक्स-शोरूम किंमत ४.९९ लाख रुपये आहे.