टू व्हीलर सेक्टरमध्ये मायलेज देणार्‍या स्कूटर्सची लांबलचक रेंज आहे, ज्यांची सुरुवातीची किंमत ६० हजार रुपयांपासून सुरू होते, ज्यामध्ये आज आम्ही तुम्हाला या सेगमेंटच्या तीन स्कूटर सांगणार आहोत ज्या १०० सीसी इंजिनसह हलक्या वजनात येतात आणि ६० kmpl पेक्षा जास्त मायलेज सुद्धा देतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या टॉप ३ स्कूटर्समध्ये, आम्ही तुम्हाला त्यांची किंमत, मायलेज आणि स्पेसिफिकेशनचे प्रत्येक डिटेल्स सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही योग्य पर्याय निवडू शकता.

आणखी वाचा : केवळ १ ते २ लाखांमध्ये घरी घेऊन जा Hyundai i10, गॅरंटी आणि वॉरंटी सुद्धा मिळणार

TVS Jupiter: ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे, जी कंपनीने पाच प्रकारांसह बाजारात आणली आहे. या स्कूटरमध्ये १०९.७ cc सिंगल सिलेंडर इंजिन आहे, जे ७.८८ PS ची पॉवर आणि ८.८ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

या स्कूटरच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ती ६४ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. TVS Jupiter ची सुरुवातीची किंमत ६६,९९८ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

Hero Pleasure Plus: ही आकर्षक डिझाइन केलेली स्कूटर आहे जी कंपनीने Xtec अवतारासह बाजारात लॉंच केली आहे.

स्कूटरमध्ये ११०.९ cc सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे ८.१ PS पॉवर आणि ८.७ Nm पीक टॉर्क जनरेट करते.

स्कूटरच्या मायलेजबद्दल, कंपनीचा दावा आहे की ही प्लेजर प्लस ६३ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. Hero Pleasure Plus ची सुरुवातीची किंमत ६२,२२० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

आणखी वाचा : Royal Enfield Classic 350 : ही क्रूझर बाईक ७२ हजार ते १ लाखांपर्यंत मिळत आहे, जाणून घ्या ऑफर

TVS Scooty Zest: ही एक स्लिम आणि कमी वजनाची स्कूटर आहे जी कंपनीने दोन प्रकारांमध्ये लॉंच केली आहे. या स्कूटीमध्ये १०९.७ cc सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे ७.८१ PS पॉवर आणि ८.८ Nm पीक टॉर्क जनरेट करते.

मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की स्कूटर ६२ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. TVS Scooty Zest ची सुरुवातीची किंमत ६५,४१६ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे जी टॉप व्हेरिएंटवर ६६,३१८ रुपयांपर्यंत जाते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top 3 light weight scooters with 64 kmpl mileage tvs jupiter hero pleasure plus tvs scooty zest read full details prp