देशात फेस्टिव्ह सीझन सुरू झाला आहे, ज्यामध्ये नवरात्री आणि दिवाळी प्रमुख आहेत. या प्रसंगी लोकांना नवीन वाहने खरेदी करायला आवडतात. हे लक्षात घेऊन वाहन उत्पादकांनी त्यांच्या वाहनांची विक्री वाढवण्यासाठी आकर्षक डिस्काउंट आणि इतर ऑफर सुरू केल्या आहेत.
जर तुम्हीही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल किंवा तुम्हाला नवीन कारवर मिळणाऱ्या डिस्काउंट ऑफरबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर आम्ही तुम्हाला ५ लाखांच्या बजेटमध्ये येणाऱ्या चार कारची माहिती सांगत आहोत, ज्या खरेदी केल्यावर तुम्हाला ५० हजार रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो.
Maruti S Presso
मारुती एस्प्रेसो ही एक मायक्रो एसयूव्ही आहे जी तुम्ही नवरात्रीच्या सणासुदीच्या काळात खरेदी केल्यास तुम्हाला ४९,००० रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. मारुती सुझुकी या एसयूव्हीवर वेगवेगळ्या व्हेरिएंटनुसार डिस्काउंट देत आहे.
आणखी वाचा : Maruti Swift केवळ १ लाखांच्या फायनान्स प्लॅनसह मिळतेय, वाचा ऑफर
जर तुम्ही मारुती एस्प्रेसोचे मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरिएंट खरेदी केले तर तुम्हाला ४९ हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते आणि जर तुम्ही या एसयूव्हीचे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरिएंट खरेदी केले तर तुम्हाला ३४ हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
मारुती एस्प्रेसोची सुरुवातीची किंमत ४.२५ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे जी टॉप व्हेरियंटवर ५.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पर्यंत जाते.
Renault Kwid
Renault Kwid ही हॅचबॅक सेगमेंटमधील कार आहे, जी आकर्षक डिझाईन, फीचर्स आणि मायलेजमुळे बाजारात चांगली पकड ठेवत आहे. या फेस्टिव्ह सीझनमध्ये तुम्ही Renault Kwid खरेदी केल्यास तुम्हाला ३५ हजार रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो.
रेनॉल्ट या हॅचबॅकवर देत असलेल्या सवलतींमध्ये १० हजार रूपयांचा कॅश डिस्काउंट, १० हजार रूपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट आणि १५ हजार रूपयांचा एक्सचेंज बोनस यांचा समावेश आहे.
Renault Kwid चे बेस मॉडेल ४,६४,४०० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते आणि टॉप व्हेरियंटमध्ये ५,९९,००० रुपयांपर्यंत जाते.
Maruti Alto 800
मारुती अल्टो ही देशातील सर्वात स्वस्त एंट्री लेव्हल हॅचबॅक कार आहे, जी खरेदी केल्यावर तुम्हाला २९,००० रुपयांपर्यंत फायदा होणार आहे. ही डिस्काउंट ऑफर या कारच्या सर्व व्हेरिएंटवर लागू आहे.
मारुती अल्टो स्टँडर्डची सुरुवातीची किंमत ३,३९,००० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. टॉप व्हेरियंटमध्ये अल्टोची किंमत ५,०३,००० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पर्यंत जाते.
Hyundai Santro
Hyundai Santro ही हॅचबॅक सेगमेंटमधील कंपनीची सर्वात जुनी आणि लोकप्रिय कार आहे. तुम्ही ही कार खरेदी केली तर तुम्हाला २८ हजार रुपयांपर्यंत फायदा होणार आहे. कंपनीची ही सूट या कारच्या सर्व व्हेरिएंटवर लागू आहे.
Hyundai Santro ची सुरुवातीची किंमत ४,८९,७०० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे आणि या कारची किंमत टॉप व्हेरियंटमध्ये ६,४१,६०० रुपये आहे.