Top Sportiest Bikes in India: भारतात बाईक्सची क्रेझ खूप वेगाने वाढत आहे, अशा परिस्थितीत सर्व दुचाकी उत्पादक कंपन्या रोज नवनवीन बाईक्स लाँच करत आहेत. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा बाईक प्रेमी असाल आणि स्वस्तात चांगली बाईक मिळवू इच्छित असाल तर आज आम्ही तुम्हाला कमी किमतीत अशा तीन बाइक्सबद्दल सांगणार आहोत, ज्या पॉवरफुल इंजिनसोबतच चांगला मायलेज देतात. जर तुमचे बजेट दोन लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्ही ही बाईक खरेदी करू शकता.

‘या’ बाईक आहेत बेस्ट

KTM 200 Duke

ऑस्ट्रियातील बाईक निर्माता कंपनी केटीएम बाईकचे तरुणांना वेड आहे, मुलांसोबतच मुलीनांही या बाईकचे वेड लागले आहेत. या बाईकमध्ये तुम्हाला १९९.५ cc इंजिन देण्यात आले आहे जे २४.६७ bhp पॉवर जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, ही बाईक ३३ किमी मायलेज देते. या बाईकमध्ये कंपनी तुम्हाला ९.२ लीटरची इंधन टाकी देते, तसेच या बाईकचे एकूण वजन १५९ किलो आहे.

Broccoli Or Cauliflower - Which Is Healthier?
ब्रोकोली की फ्लॉवर ? आरोग्यासाठी कोणती भाजी जास्त फायदेशीर; जाणून घ्या पोषणतज्ञ काय सांगतात
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Fan came inside the stadium to meet Babar Azam
बाबर आझमला भेटायला आला चाहता, हारिस रौफने पाहिलं आणि…. VIDEO व्हायरल
Bananas and Curd
केळी आणि दह्याचे एकत्रित सेवन लैंगिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
Reserve Bank Deputy Governor Swaminathan warns Fintech to avoid debt recovery in wrong way
कर्जवसुली चुकीच्या पद्धतीने नको, रिझर्व्ह बँक डेप्युटी गव्हर्नर स्वामिनाथन यांचा ‘फिनटेक’ना इशारा
father and mother cried at the moment of kanyadaan at daughters wedding ceremony
मायबापासाठी सर्वात कठीण क्षण! लेकीच्या कन्यादानावेळी आईवडीलांना अश्रु अनावर, Video पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी
Best Selling Electric Scooter
Activa, Jupiter नव्हे तर देशातील बाजारात ‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटरची तुफान विक्री; खरेदी करण्यासाठी ग्राहकांची शोरूम्सवर गर्दी
tata sons debt payment
टाटा सन्सकडून सक्तीची सूचिबद्धता टाळण्यासाठी २०,००० कोटींची कर्जफेड

(हे ही वाचा : आली रे आली, देशातील सर्वात लहान आणि स्वस्त इलेक्ट्रिक कार बाजारपेठेत दाखल, Apple iPod सारखं कंट्रोल पॅनल अन्…)

Bajaj Pulsar RS 200

Pulsar RS 200 बजाजच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या स्पोर्ट्स बाईकपैकी एक, ही बाईक देखील बाजारात कमी लोकप्रिय नाही. या बाईकमध्ये तुम्हाला १९९.५cc इंजिन मिळेल जे २४.१bhp पॉवर जनरेट करते. मायलेजबद्दल बोलत असताना, बजाजने दावा केला आहे की, ही बाईक ३५ किमी मायलेज देईल, परंतु अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जातो की जर तुम्ही ही बाईक त्याच वेगाने चालवली तर ही बाईक ४० किमी पर्यंतचा मायलेज देईल.

Yamaha Mt 15 V2

कमी किमतीत चांगली बाईक घेण्याबाबत बोलायचे झाले तर त्यात यामाहाचे नाव येत नाही असे होऊ शकत नाही. अलीकडेच कंपनीने भारतात एक नवीन बाइक लाँच केली आहे, तेव्हापासून तिच्या विक्रीने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. कमी किंमत आणि दमदार इंजिनमुळे लोकांना ही बाईक खूप आवडते. यामध्ये यामाहाने १५५cc इंजिन दिले आहे, जे १८.१bhp पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. जर आपण त्याच्या मायलेजबद्दल बोललो तर कंपनीच्या मते, या बाईकमध्ये तुम्हाला ४७.५ मायलेज मिळेल.

TVS Raider

125cc सेगमेंटमध्ये या बाईकमध्ये सर्वाधिक वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. TVS Raider ची सुरुवातीची किंमत ९३,७१९ रुपये आहे. Raider १२४.८cc, सिंगल-सिलेंडर, एअर आणि ऑइल-कूल्ड आणि इंधन-इंजेक्टेड इंजिनसह सुसज्ज आहे. ही मोटर ११.२ Bhp आणि ११.२ Nm पीक टॉर्क निर्माण करते, जी ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडली जाते.