Best CNG Cars list: डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांव्यतिरिक्त सीएनजी कारलाही भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. कारण पेट्रोल आणि डिझेल कार चालवणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबांना सातत्याने वाढणाऱ्या इंधनाच्या किमतीने हैराण केले आहे. कारने लांबचा प्रवास करण्यासाठी पेट्रोल व डिझेलसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे अनेक जण आता सीएनजी कारची खरेदी करीत आहेत. 

बाजारात सर्वोत्कृष्ट सीएनजी कार मोठ्या संख्येने आहेत, ज्या कमी किमतीत दीर्घ मायलेजचा दावा करतात. तुम्हीही सीएनजी कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. वास्तविक, भारतीय बाजारपेठेत अशी अनेक मॉडेल्स आहेत जी तुम्हाला CNG वर उत्तम मायलेज तर देतातच पण बजेट सेगमेंटमध्येही येतात. यामध्ये देशांतर्गत कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्स, ह्युंदाई इंडिया, मारुती सुझुकी आणि टोयोटा यांच्या कारचा समावेश आहे. या मॉडेल्समध्ये तुम्हाला कमाल ३४ किलोमीटर प्रति किलोग्राम सीएनजीचा मायलेज मिळतो. अशा पाच सीएनजी मॉडेल्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया जे तुम्हाला फक्त चांगले मायलेज देत नाहीत तर बजेट सेगमेंटमध्येही येतात.

navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
iPhone News
iPhone : अँड्रॉईडऐवजी आयफोन असल्यास टॅक्सी APP बुकिंगचे दर वाढतात का? सोशल मीडियावर काय चर्चा?
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
traffic jam at Khandala Ghat , traffic jam Mumbai Pune Expressway,
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी; दहा ते बारा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा
pune video
“चला गोल फिरा..” ही पुणेरी पाटी कशासाठी? Video होतोय व्हायरल

(हे ही वाचा : मायलेज २४ किमी, तुफान मागणीमुळे कंपनीने बुकिंग बंद केलेल्या ‘या’ ८ सीटर कारचे २ महिन्यानंतर बुकिंग पुन्हा सुरु, किंमत… )

भारतातील ‘५’ बेस्ट सीएनजी कार

मारुती सुझुकी अल्टो K10 CNG

जर तुम्ही परवडणाऱ्या किमतीत उत्तम मायलेज असलेली सीएनजी कार घेण्याचा विचार करत असाल, तर मारुती सुझुकी अल्टो K10 तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकते. मारुती सुझुकी अल्टो K10 च्या CNG मॉडेलची एक्स-शोरूम किंमत ५.७३ लाख रुपये आहे. ही कार ग्राहकांना ३४ किमी मायलेज देण्याचा दावा करते. या कारला भारतीय बाजारात ग्राहकांची मोठी पसंती दिसून येते.

मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजी

मारुती सुझुकी सेलेरिओचे सीएनजी मॉडेल देखील परवडणाऱ्या किमतीत चांगले मायलेज देण्याच्या दृष्टीने उत्तम पर्याय ठरू शकते. मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजी आपल्या ग्राहकांना ३४ किमी मायलेज देण्याचा दावा करते. भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ६.७३ लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी वॅगनआर सीएनजी

मारुती सुझुकी वॅगनआरचे सीएनजी मॉडेल, जे भारतीय ग्राहकांमध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारांपैकी एक आहे, ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय आहे. मारुती सुझुकी वॅगनआर सीएनजी आपल्या ग्राहकांना ३३ किमी मायलेज देण्याचा दावा करते. भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकी वॅगनआर सीएनजीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ६.४ लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी एस-प्रेसो सीएनजी

जर तुम्ही नवीन सीएनजी कार घेण्याचा विचार करत असाल, तर मारुती सुझुकी एस-प्रेसोचे सीएनजी मॉडेल तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरु शकते. मारुती सुझुकी S-Presso चे CNG मॉडेल आपल्या ग्राहकांना ३३ किमी मायलेज देण्याचा दावा करते. तर ही कार भारतीय बाजारपेठेत ग्राहकांना ५.९१ लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे.

टाटा टियागो सीएनजी

भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्स आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत उत्तम इंधन कार्यक्षमतेसह Tiago CNG मॉडेल ऑफर करते. या कारने ग्राहकांना २६ किमी मायलेज देण्याचा दावा केला आहे. तर भारतीय बाजारात Tata Tiago CNG ची एक्स-शोरूम किंमत ७.५४ लाख रुपये आहे.

आता वरिल माहितीच्या आधारे तुम्ही ठरवा, कोणती CNG कार असेल तुमच्यासाठी खास

Story img Loader