Top 5 Best Selling Electric Scooters in February 2025 : इलेक्ट्रिक स्कूटर्स बनवणाऱ्या कंपन्यांसाठी फेब्रुवारी २०२५ हा महिना उत्तम होता. या महिन्यात अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री वाढली आहे. विशेष म्हणजे या महिन्यात बजाज ऑटोने मोठी मुसंडी मारली आहे. बजाजने ओला, टीव्हीएस, अ‍ॅथरसह अनेक इलेक्ट्रिक दुचाकी बनवणाऱ्या कंपन्यांना मागे टाकत सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटर्स विकण्याचा विक्रम केला आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार भारतीय इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या बाजारात बजाजने मोठी हिस्सेदारी मिळवली आहे.

भारतीय वाहन बाजारात सर्वाधिक इलेक्ट्रिक स्टूकर्स विक्रीच्या बाबतीत टीव्हीएस मोटर ही कंपनी दुसऱ्या स्थानी आहे. अ‍ॅथर तिसऱ्या स्थानी कायम आहे. तर, ओला व ग्रीव्ह्ज इलेक्ट्रिक या दोन कंपन्या अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहेत.

बजाज ऑटो

बजाज ऑटोने गेल्या काही महिन्यांत बाजारातील आपली स्थिती सुधारली आहे. जानेवारी महिन्यात गमावलेलं बाजारातील पहिलं स्थान फेब्रुवारी महिन्यात कंपनीने परत मिळवलं आहे. फेब्रुवारी महिन्यात बजाजने त्यांच्या चेतक इलेक्ट्रिक स्कूटर्सचे २१,३८९ युनिट्स विकले आहेत. जानेवारी महिन्याच्या तुलनेत यामध्ये ०.३७ टक्के वाढ झाली आहे. तर गेल्या वर्षीच्या (२०२५) फेब्रुवारी महिन्यातील विक्रीच्या तुलनेत यामध्ये तब्बल ८१.८२ टक्के वाढ झाली आहे. जानेवारी २०२५ मध्ये कंपनीने बजाज चेतकचे २१,३१० युनिट्स विकले होते. तर गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात कंपनीने बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचे ११,७६४ युनिट्स विकले होते.

टीव्हीएस मोटर

टीव्हीएस मोटरने गेल्या महिन्यातील बाजारातील आपलं पहिलं स्थान गमावलं आहे. जानेवारी महिन्यात ही कंपनी पहिल्या स्थानी होती, तर फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्या स्थानी घसरली आहे. फेब्रुवारी महिन्यात टीव्हीएसने त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सचे १८,७६२ युनिट्स विकले आहेत. जानेवारी महिन्याच्या तुलनेत यामध्ये २१ टक्के घट झाली आहे. तर गेल्या वर्षीच्या (२०२५) फेब्रुवारी महिन्यातील विक्रीच्या तुलनेत यामध्ये तब्बल २८.१६ टक्के वाढ झाली आहे. जानेवारी २०२५ मध्ये कंपनीने टीव्हीएस इलेक्ट्रिक स्कूटर्सचे २३,८०९ युनिट्स विकले होते. तर गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात कंपनीने टीव्हीएस इलेक्ट्रिक स्कूटरचे १४,६३९ युनिट्स विकले होते.

अ‍ॅथर एनर्जी

एफएडीएच्या अहवालानुसार फेब्रुवारी महिन्यात अ‍ॅथर एनर्जीने त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सचे ११,८०७ युनिट्स विकले आहेत. जानेवारी महिन्याच्या तुलनेत यामध्ये ८ टक्के घट झाली आहे. तर, गेल्या वर्षीच्या (२०२५) फेब्रुवारी महिन्यातील विक्रीच्या तुलनेत यामध्ये तब्बल २९.८० टक्के वाढ झाली आहे. जानेवारी २०२५ मध्ये कंपनीने अ‍ॅथर इलेक्ट्रिक स्कूटरचे १२,९०६ युनिट्स विकले होते. तर गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात कंपनीने त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरचे १०,००० युनिट्स विकले होते.

ओला इलेक्ट्रिक

ओला इलेक्ट्रिकने फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सचे ८,६४७ युनिट्स विकले आहेत. जानेवारी महिन्याच्या तुलनेत यामध्ये ५४.४७ टक्के घट झाली आहे. तर गेल्या वर्षीच्या (२०२५) फेब्रुवारी महिन्यातील विक्रीच्या तुलनेत यामध्ये तब्बल ७४.६१ टक्के घट झाली आहे. जानेवारी २०२५ मध्ये कंपनीने ओला इलेक्ट्रिकचे २४,३३६ युनिट्स विकले होते.

ग्रीव्ह्ज इलेक्ट्रिक मोबिलिटी

ग्रीव्ह्ज इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीने फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सचे ३,७०० युनिट्स विकले आहेत. जानेवारी महिन्याच्या तुलनेत यामध्ये २.४६ टक्के वाढ झाली आहे. तर गेल्या वर्षीच्या (२०२५) फेब्रुवारी महिन्यातील विक्रीच्या तुलनेत यामध्ये तब्बल ४८.७१ टक्के वाढ झाली आहे. जानेवारी २०२५ मध्ये कंपनीने ३,६११ इलेक्ट्रिक स्कूटर्स विकल्या होत्या. तर, गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात १,४८८ इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री केली होती.