Top 5 best-selling scooter brands in June 2024: मोटरसायकल विक्रीच्या तुलनेत जून २०२४ मध्ये स्कूटरच्या विक्रीत चांगली वाढ दिसून आली. बाइक्सची खरेदी करणारा वर्ग मोठी असला तरीही स्कूटरची एकूण देशांतर्गत होणारी विक्री उत्साहवर्धक आहे. चला तर पाहू जूनमध्ये ‘टॉप ५’मध्ये कोणत्या कोणत्या ब्रॅण्डच्या स्कूटर सर्वाधिक प्रमाणात विकल्या गेल्या.

यामाहा

Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
IPL 2025 player auction list announced 574 cricketers set to feature with 204 slots available See Full List in Marathi
IPL 2025 Players Auction List: आयपीएल २०२५ च्या लिलावासाठी खेळाडूंची यादी जाहीर, २०४ जागांसाठी ५०० हून अधिक खेळाडूंवर लागणार बोली
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल
2024 Maruti Suzuki Dzire Launch Live Updates: Prices start at Rs 6.79 lakh, to rival Honda Amaze
५ स्टार सेफ्टी रेटिंग, जबरदस्त मायलेज आणि आकर्षक लूकसह नवीन मारुती जनरेशन Dzire 2024 लाँच; पाहा किंमत
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या

जून २०२४ मध्ये यामाहा स्कूटर विक्रीमध्ये पाचव्या स्थानावर आहे. जून २०२३ मध्ये विकल्या गेलेल्या २३,०१३ युनिट्सच्या तुलनेत गेल्या महिन्यात २६,०३१ युनिट्सची विक्री झाली आहे. १३.१ टक्के अशी वार्षिक वाढ नोंदवली आहे. यामाहासाठी गेल्या महिन्यात मोटरसायकलींनी स्कूटरच्या विक्रीला मागे टाकले; परंतु जून २०२३ च्या तुलनेत त्यात वार्षिक घट झाली आहे.

हिरो मोटोकॉर्प

दुचाकी विक्री आणि मोटरसायकल विक्रीच्या बाबतीत हिरो मोटोकॉर्प आघाडीवर आहे. तर जून २०२४ मध्ये स्कूटरच्या विक्रीमध्ये कंपनीला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. हिरोने जून २०२३ मध्ये २९,७०८ च्या तुलनेत २८,८७१ युनिट्सची विक्री केली, ज्यात २.८ टक्क्यांची वार्षिक घट झाली. तर मोटरसायकल सेगमेंटमध्ये हिरो मोटोकॉर्पने १७.६ टक्के वाढ नोंदवली आहे.

सुझुकी

देशांतर्गत दुचाकी विक्रीच्या बाबतीत सुझुकीने गेल्या काही महिन्यांत सातत्याने रॉयल एनफिल्डच्या पुढे राहण्यात यश मिळविले आहे. तर भारतातील सुझुकीच्या बहुतांश विक्रीमध्ये स्कूटरचा वाटा आहे. जून २०२४ मध्ये सुझुकीने ६९,८५३ युनिट्स विकली; ज्यात १६.६ टक्के वार्षिक वाढ झाली. सुझुकीने जून २०२३ मध्ये भारतात ५९,८७२ इतक्या स्कूटर्स विकल्या.

टीव्हीएस

होसूर-आधारित टीव्हीएसने देशांतर्गत स्कूटर विक्रीसाठी दुसरे स्थान मिळवले असून, जून २०२४ मध्ये १,२३,९१२ युनिट्सची विक्री नोंदवली. टीव्हीएसची जून २०२३ मध्ये विक्री १,१४,०५९ युनिट्स होती म्हणजे वार्षिक ८.६ टक्के वाढ. टीव्हीएसमध्ये ntorq आणि Jupiter ही भारतातील दोन सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर मॉडेल्स आहेत.

हेही वाचा >> TVS CNG 125cc scooter: बजाजनंतर आता टीव्हीएसही लाँच करणार सीएनजी बाईक; जाणून घ्या किंमत

होंडा

देशांतर्गत बाजारात स्कूटर विक्रीच्या बाबतीत होंडा आघाडीवर आहे. जपानी निर्मात्याची Activa ही मॉडेल अनेक वर्षांपूर्वी लाँच झाल्यापासून सेगमेंट लीडर आहे. जून २०२४ मध्ये होंडाने भारतात २,६५,९६० स्कूटर्स विकल्या; तर जून २०२३ मध्ये १,४०,०१९ युनिट्सची विक्री केली होती. म्हणजे जवळजवळ ९० टक्के वार्षिक वाढ झाली.