Top 5 Cars With Sunroof Under 10 Lakhs: रील्समध्ये व्हायरल होणाऱ्या गाड्यांचा एक सर्वात गाजलेला प्रकार म्हणजे सनरूफ असणारी कार. विशेषतः आता पावसाळ्यात तर छान हिरव्यागार झाडी असणाऱ्या रस्त्यावरून जाताना मंद वारा अंगावर झेलण्याचा अनुभव घेण्याची संधी या गाड्या देतात. लग्जरी गाड्यांची ही खासियत आता हॅचबॅक, एसयूव्ही गाड्यांमध्ये सुद्धा समाविष्ट केल्याचे पाहायला मिळते. अर्थात आपल्याला या गाड्या बघायला कितीही आवडल्या तरी खर्चाच्या चिंतेने विकत घेण्याचा विचारच मनात येत नाही. तुमची ही चिंता दूर करतील अशा पाच बेस्ट गाड्यांचे पर्याय आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. सनरूफ असणाऱ्या या गाड्या तुम्ही चक्क १० लाखांहून कमी किमतीत विकत घेऊ शकता. या गाड्यांची निर्मिती टाटा, ह्युंदाई, महिंद्रा अशा प्रतिष्ठित कंपन्यांनी केली असल्याने गुणवत्तेबाबत सुद्धा फार काळजी करण्याची वेळ येणार नाही. तुमच्या बजेटमध्ये बसतील आणि गरजेला पूर्ण करतील अशा सनरूफ असणाऱ्या गाड्यांचे हे पाच बेस्ट पर्याय पहा.

१० लाख रुपयांच्या आत घरी आणा सनरूफ असलेल्या ‘या’ कार

टाटा अल्ट्रोझ (Tata Altroz)

Tata Altroz ​​ही भारतातील १० लाख रुपयांच्या आत सनरूफ असलेली सर्वात परवडणारी हॅचबॅक आहे. Tata Altroz चे सर्वात खास वैशिट्य म्हणजे तिचा लुक. टाटा मोटर्सची ही निर्मिती सर्वोत्तम दिसणाऱ्या हॅचबॅकपैकी एक आहे. त्याची किंमत ६.६४ लाख (एक्स-शोरूम) रुपयांपासून सुरू होते. Altroz ​​मध्ये ८७ bhp- १.२ लिटर पेट्रोल इंजिन किंवा ८९ bhp- १.५ -लिटर डिझेल इंजिन हे पर्याय उपलब्ध आहेत. टाटाच्या या गाडीसाठी सीएनजी पर्याय सुद्धा उपलब्ध आहे.

Tata Punch facelift 2024
टाटाचा नाद करायचा नाय! देशात नव्या अवतारात आणतेय ‘ही’ सर्वात सुरक्षित कार; मायलेज २६ किमी अन् किंमतही कमी
Maruti Fourth gen Swift
६.५ लाखाच्या ‘या’ कारनं Punch, Creta चं संपवलं वर्चस्व! खरेदीसाठी हजारो ग्राहकांच्या रांगा, मायलेज २५.७५ किमी
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
Man wrote message for his wife in back of the car
नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Car Sales Drop in May 2024
देशातील बाजारात ‘या’ २ कारकडे ग्राहकांनी फिरवली पाठ; ३० दिवसात फक्त ४ लोकांनी केली खरेदी
Police found dead body of a man in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Tata Altroz Racer
Maruti Swift चा खेळ संपणार? टाटाने खेळला नवा गेम; आणली देशातील पहिली प्रीमियम हॅचबॅक कार, बुकींगही सुरु, किंमत…

ह्युंदाई एक्स्टर (Hyundai Exter)

या यादीतील पुढील गाडी म्हणजे Hyundai Exter. ८२ bhp- १.२ लिटर पेट्रोल इंजिनसह उपलब्ध असलेल्या Exter ची किंमत ६.१२ लाखांपासून सुरु होते. टाटा पंचच्या तोडीस तोड म्हणून ह्युंदाईकडून ही गाडी बाजारात आणली गेल्याचे सुद्धा म्हटले जाते. या गाडीमध्ये सुद्धा ग्राहकांना सीएनजी पर्याय मिळू शकतो. सनरूफ असलेल्या एक्स्टर या गाडीची किंमत ८.२३ लाख रुपयांपर्यंत आहेत तुलनेने ही गाडी, समान फीचर्स असलेल्या टाटा पंचपेक्षा ११ हजार रुपयांनी स्वस्त आहे.

टाटा पंच (TATA Punch)

टाटा मोटर्सची सर्वाधिक विकली जाणारी गाडी म्हणजे टाटा पंच. टाटाच्या मायक्रो एसयूव्हीची किंमत ६. १२ लाख रुपये आहे. एक्स-शोरूम आणि सनरूफ पर्याय असलेल्या व्हेरियंटची किंमत ८.३४ लाख रुपये आहे. तसेच, पंच ही पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक आवृत्तीच्या पर्यायात सुद्धा उपलब्ध आहे.

Hyundai i20 sportz o

Hyundai, i20 हॅचबॅक ही ७.०४ लाखात रुपयात मिळणारी ह्युंदाईची निर्मिती बहुचर्चित पर्यायांपैकी एक आहे. Hyundai i20 Sportz(O) व्हेरियंटला सनरूफ पर्याय मिळतो, आणि त्याची किंमत ८.७२ लाख रुपयांपासून सुरू होते. Hyundai i20 मध्ये ८२ bhp- १.२ लीटर पेट्रोल इंजिन किंवा ८७ bhp युनिट पर्याय उपलब्ध आहे.

हे ही वाचा<< कार्तिक आर्यनच्या कारचे उंदरांमुळे करोडोंचे नुकसान; तुमची गाडी सुरक्षित ठेवायची तर आजच ‘हे’ करा

महिंद्रा XUV 3XO (Mahindra XUV 3XO)

या यादीतील पाचवी गाडी म्हणजे नवीन लाँच झालेली महिंद्रा XUV 3XO. ही गाडी XUV300 ची सुधारित आवृत्ती आहे. Mahindra XUV 3XO ची किंमत ७.४९ लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते, तर सनरूफ असलेल्या व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत ८.९९ लाख रुपये आहे.