Top 5 Cars With Sunroof Under 10 Lakhs: रील्समध्ये व्हायरल होणाऱ्या गाड्यांचा एक सर्वात गाजलेला प्रकार म्हणजे सनरूफ असणारी कार. विशेषतः आता पावसाळ्यात तर छान हिरव्यागार झाडी असणाऱ्या रस्त्यावरून जाताना मंद वारा अंगावर झेलण्याचा अनुभव घेण्याची संधी या गाड्या देतात. लग्जरी गाड्यांची ही खासियत आता हॅचबॅक, एसयूव्ही गाड्यांमध्ये सुद्धा समाविष्ट केल्याचे पाहायला मिळते. अर्थात आपल्याला या गाड्या बघायला कितीही आवडल्या तरी खर्चाच्या चिंतेने विकत घेण्याचा विचारच मनात येत नाही. तुमची ही चिंता दूर करतील अशा पाच बेस्ट गाड्यांचे पर्याय आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. सनरूफ असणाऱ्या या गाड्या तुम्ही चक्क १० लाखांहून कमी किमतीत विकत घेऊ शकता. या गाड्यांची निर्मिती टाटा, ह्युंदाई, महिंद्रा अशा प्रतिष्ठित कंपन्यांनी केली असल्याने गुणवत्तेबाबत सुद्धा फार काळजी करण्याची वेळ येणार नाही. तुमच्या बजेटमध्ये बसतील आणि गरजेला पूर्ण करतील अशा सनरूफ असणाऱ्या गाड्यांचे हे पाच बेस्ट पर्याय पहा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा