Top 5 Cheapest 6 Seaters: भारतासारख्या किमतीच्या बाबतीत संवेदनशील मार्केटमध्ये कार खरेदीदार सर्वोत्तम डील किंवा वाहन किती किफायतशीर आहे हे पाहत आहेत. आज आपण MPV आणि SUV सारख्या सर्वात बजेट-फ्रेंडली गाड्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊ या…
मारुती सुझुकी XL 6 (Maruti Suzuki XL6)
सहा सीटर XL 6 ही मारुती सुझुकीच्या बहुतेक गाड्यांसारखी यशस्वी झाली नसली तरी, सेकंड रोमध्ये त्यात कॅप्टन सीट मात्र आहेत. XL6 मध्ये १.५-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे जे ६००० आरपीएम वर १०१.६ बीएचपी आणि ४४०० आरपीएम वर १३६.८ एनएम टॉर्क आउटपुट देते. यात दोन ट्रान्समिशन पर्याय आहेत – ५-स्पीड मॅन्युअल किंवा ६-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. XL6 ही CNG मध्ये देखील उपलब्ध आहे. पेट्रोल रेंजची किंमत ११.७१ लाख रुपयांपासून ते १४.७१ लाख रुपयांपर्यंत आहे तर एकमेव CNG ट्रिमची किंमत १२.६६ लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) आहे.
किआ कॅरेन्स (Kia Carens)
कॅरेन्स ही किआसाठी एक स्टेडी परफॉर्मर आहे कारण ती नियमितपणे ५,००० हून अधिक युनिट्सची विक्री करते. किआ एमपीव्ही तीन इंजिन ट्रिममध्ये उपलब्ध आहे – ११३ बीएचपीसह १.५ एनए पेट्रोल, १५८ बीएचपीसह १.५ टर्बो पेट्रोल आणि ११४ बीएचपीसह १.५ डिझेल. कॅरेन्सची किंमत १०.६० लाख रुपयांपासून सुरू होते, परंतु कॅप्टन सीट्स व्हर्जन फक्त पेट्रोल व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे ज्याची किंमत ११.९९ लाख रुपयांपासून सुरू होते आणि ती १९.५० लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) आहे.
महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक (Mahindra Scorpio Classic)
जुन्या जनरेशमधील स्कॉर्पिओ किंवा क्लासिक ही बाजारपेठेतील सर्वात किफायतशीर एसयूव्हींपैकी एक आहे. स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये फक्त टॉप-द-लाइन व्हेरिएंट, S11 मध्ये सेकंड रो इंडिपेंडंट सीट्स आहेत, जी पर्यायी आहे. लास्ट रोमध्ये फक्त एकमेकांसमोर असलेल्या सीट्स आहेत. स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये २.२-लिटर डिझेल इंजिन आहे जे ३७५० आरपीएम वर १३० बीएचपी आणि १६०० – २८०० आरपीएम वर ३०० एनएम टॉर्क निर्माण करते. ते फक्त ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. स्कॉर्पिओ क्लासिक S11 ची एक्स-शोरूम किंमत १७.५० लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
एमजी हेक्टर प्लस (MG Hector Plus)
हेक्टर प्लस सहा-सीटर वर्जन एंट्री-लेव्हल स्टाइलमध्ये उपलब्ध आहे. त्यात दोन इंजिन पर्याय आहेत – १.५-लिटर पेट्रोल आणि २-लिटर डिझेल. पहिल्यामध्ये ६-स्पीड मॅन्युअल किंवा सीव्हीटी असे दोन पर्याय आहेत, तर दुसऱ्यामध्ये फक्त ६-स्पीड मॅन्युअल मिळते. पेट्रोल इंजिन ५००० आरपीएम वर १४१ बीएचपी आणि १६०० – ३६०० आरपीएम वर २५० एनएम टॉर्क निर्माण करते, तर डिझेल इंजिन ३७५० आरपीएम वर १६८ बीएचपी आणि १७५०-२५०० आरपीएम वर ३५० एनएम टॉर्क निर्माण करते. हेक्टर प्लसची किंमत १७.५० लाख रुपयांपासून सुरू होते आणि ती २३.४१ लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) आहे.
महिंद्रा XUV700 (Mahindra XUV700)
XUV700 मध्ये फक्त AX7 आणि AX7 लक्झरी ट्रिम्समध्ये सहा-सीटर लेआउट आहे. महिंद्रा एसयूव्ही २-लिटर पेट्रोल किंवा २.२-लिटर डिझेल पॉवरट्रेनद्वारे चालते. दोन्ही इंजिनमध्ये दोन ट्रान्समिशन आहेत – एक ६-स्पीड मॅन्युअल आणि एक ६-स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर. पेट्रोल इंजिन १९७ बीएचपी आणि ३८० एनएम टॉर्क निर्माण करते आणि डिझेल इंजिन १८२ बीएचपी आणि ४५० एनएम टॉर्क निर्माण करते. सहा सीटर XUV700 ची किंमत १९.६९ लाख रुपयांपासून सुरू होते आणि ती २५.०९ लाख रुपयांपर्यंत, (एक्स-शोरूम) आहे.