आधुनिक काळातील स्कूटर्सनी कुटुंबासाठी सोयीस्कर दुचाकी असण्याची मानसिकता मोडून काढली आहे. हिरो मोटोकॉर्पच्या”सर्व मज्जा फक्त मुलांनी घ्यावी? (Why should boys have all the fun)या टॅगलाइन तुम्ही ऐकली असेल. अगदी त्याचप्रमाणे ” सर्व मज्जा मोटारसायकल चालवणार्यांनी का घ्यावी?” जर तुम्हाला चांगली कामगिरी आणि बाइक राईडिंगची मज्जा दोन्ही हवी असेल तर येथे पाच स्कूटर्स चांगला पर्याय ठरू शकतात.
हिरो झूम १६०(Hero Xoom 160)
- नवीन हिरो झूम १६० भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये १,४८,५०० रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच करण्यात आली होती.
- हिरो झूम १६०मध्ये १५६ सीसी लिक्विड कूल्ड इंजिन आहे जे ८,००० आरपीएममध्ये १४.६ बीएचपी आणि ६,५०० आरपीएममध्ये १२.९ एनएम टॉर्क देते.
- सुरळीत प्रवासासाठी या बाईकला १४-इंचाची चाके दिली आहे , ग्राउंड क्लीयरन्स १५५ मिमी, सीटची उंची ७८७ मिमी आणि इंधन टाकीची क्षमता ७ लिटर आहे.
यामाहा एरोक्स अल्फा (Yamaha Aerox Alpha )
- एरोक्स १५५ ही परवडणाऱ्या श्रेणीतील सर्वात शक्तिशाली स्कूटर आहे.
- १५५ सीसी लिक्विड कूल्ड स्कूटर ८००० आरपीएमवर १४.७ बीएचपी आणि ६५०० आरपीएमवर १३.९ एनएम टॉर्क देते.
- एरोक्स १५५ सीट उंची ७९० मिमी, ग्राउंड क्लिअरन्स १४५ मिमी आणि इंधन टाकी ५.५ लिटर आहे.
- एरोक्स १५५ ची एक्स-शोरूम किंमत १,५२,७५० रुपये आहे.
अप्रिलिया एसआर १६० (Aprilia SR 160)
- परफॉर्मन्स आणि एप्रिलिया या एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत. त्यांच्या स्कूटर एसआर १६० साठीही ही गोष्ट लागू होते.
- एप्रिलियामध्ये १६०.०३ सीसी आहे आणि ७१०० आरपीएमवर ११.११ बीएचपी आणि ५३०० आरपीएमवर १३.४४ एनएम आहे. ३० मिमी फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक आहे.
- अप्रिलियाच्या मते, स्कूटर ७.५ सेकंदात ० ते ६० किमी प्रतितास वेग पकडते.
- एसआर १६०ची महाराष्ट्रात एक्स-शोरूम किंमत १,३०,३७८ रुपये आहे.
व्हेस्पा (Vespa)
- Piaggioने अलीकडेच १२५ सीसी श्रेणीमध्ये रिफ्रेश केलेले व्हेस्पा लाँच केले.
- व्हेस्पाची ७,१०० आरपीएमवर ९.३ बीएचपी आणि ५,६०० आरपीएमवर १०.१ एनएम आउटपुट देते. या २०० मिमी फ्रंट डिस्क ब्रेक आणि १४० मिमी ड्रम ब्रेक आहे.
- व्हेस्पाची सीट उंची ७७० मिमी आणि ७.४ लिटर आहे. व्हेस्पाची महाराष्ट्रात एक्स-शोरूम किंमत १,३२,५०० रुपयांपासून सुरू होते.
TVS Ntorq (टीव्हीएस एनटॉर्क)
- Ntorq ही १२५ सीसी सेगमेंटमधील सर्वात स्पोर्टी स्कूटरपैकी एक आहे आणि त्यात १२४.८ सीसी, सिंगल-सिलेंडर, फ्युएल-इंजेक्टेड इंजिन आहे.
- Ntorq ७००० आरपीएम वर ९.३ बीएचपी आणि ५,५०० आरपीएम वर १०.६ एनएम जनरेट करते. याचा टॉप स्पीड ९० किमी प्रतितास आहे आणि ती ८.९ सेकंदात ०-६० किमी प्रतितास धावते.
- Ntorq ची महाराष्ट्रात एक्स-शोरूम किंमत ८६,९८२ रुपयांपासून सुरू होते.