Affordable automatic cars in India : ऑटोमॅटिक कार भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. कारण ट्रॅफिक रोडवर या कार चालवण्यास सोयीच्या असतात. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या कारसाठी क्लच पेडल किंवा मॅन्युअल गियर शिफ्टिंगची आवश्यकता नसते. यामुळे आम्ही सध्या भारतात टॉप पाच सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कारबद्दल सांगणार आहोत. ज्या आगामी काळात भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
भारतातील सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कार
१) मारुती सुझुकी अल्टो K10 (Maruti Suzuki Alto K10)
मारुती सुझुकी अल्टो के १० ही भारतातील सर्वात परवडणारी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन-सुसज्ज कार आहे. यात १.० लिटर नॅचरली-एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळते जे ६५.७ bhp आणि ८९ Nm पीक टॉर्क देते. इंजिन ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि AMT (AGS) ला जोडलेले आहे. त्याच्या ऑटोमॅटिक कार व्हेरियंटची शोरूम किंमत ५.५९ लाख रुपये आहे.
२) मारुती सुझुकी एस-प्रेसो ( Maruti Suzuki S-Presso)
यानंतर दुसरी सर्वात परवडणारी ऑटोमॅटिक कार म्हणजे मारुती सुझुकी एस-प्रेसो. S-Presso कार Alto K10 यंत्रासह लाँच करण्यात आली आहे, यात ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि AMT (AGS) सह १.० लिटर एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळते. मारुती सुझुकी एस-प्रेसोच्या ऑटोमॅटिक व्हेरियंटची शोरूम किंमत ५.७६ लाख रुपये आहे.
३) रेनॉल्ट क्विड (Renault Kwid)
रेनॉल्ट क्विड ही फ्रेंच कार निर्मात्यांची भारतातील सर्वात स्वस्त कार आहे. यात दोन इंजिन पर्याय आहेत: एक 800cc युनिट आणि एक १.० लिटर मोटर. आधीच्या इंजिनला फक्त ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळत होता. तर मोठ्या इंजिनला AMT पर्यायही मिळतो. रेनॉल्ट क्विडच्या ऑटोमॅटिक व्हेरियंटची शोरूम किंमत ६.१२ लाख रुपये आहे.
४) मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti Suzuki WagonR)
मारुती सुझुकी वॅगनआर ही परवडणाऱ्या किमतीसह एक प्रशस्त फॅमिली हॅचबॅक आहे. याला दोन इंजिन पर्यायदेखील मिळतात. एक म्हणजे १.० लिटर युनिट आणि दुसरे १.२ लिटर नॅचरली-एस्पिरेटेड मोटर. हे दोन्ही ५-स्पीड MT सह जोडलेले आहेत आणि नंतरचे AMT देखील मिळते. मारुती सुझुकी वॅगनआरच्या ऑटोमॅटिक व्हेरियंटची शोरूम किंमत ६.५५ लाख रुपये आहे.
५) टाटा-टियागो (Toyota Tiago)
सर्वात परवडणाऱ्या कारच्या यादीत शेवटी टाटा टियागो ही कार येते. Tiago ही टाटाची भारतातील सर्वात स्वस्त ऑफर आहे. याला १.२ लिटर अॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळते जे ८४ bhp आणि ११३ Nm पीक टॉर्क विकसित करते. इंजिन ५ स्पीड एमटी आणि एएमटीशी जोडलेले आहे. त्याच्या ऑटोमॅटिक व्हेरियंटची शोरूम किंमत ६.९२ लाख रुपयांपासून सुरू होते.