मार्च २०२४ मधील सेडानची विक्री यादी समोर आली आहे. येथे मारुती सुझुकीची कार पहिल्या क्रमांकावर आहे. मारुतीच्या सेडानने ह्युंदाई आणि होंडा या लोकप्रिय गाड्यांनाही मागे टाकले आहे. जर आपण टॉप ११ सेडान कारच्या विक्रीबद्दल बोललो तर मार्च २०२४ मध्ये एकूण ३२,३४६ युनिट्सची विक्री झाली. आता आम्ही तुम्हाला मार्च महिन्यात सर्वाधिक विकल्या टॉप ५ सेडान कारबद्दल सांगणार आहोत, जाणून घ्या…
Maruti Dzire
मारुती डिझायर या यादीमध्ये अव्वल स्थानावर आहे, ज्याचा ११ च्या यादीत ४९.१४ टक्के हिस्सा आहे. मार्च २०२४ च्या केवळ एका महिन्यात, १५,८९४ युनिट्सची विक्री झाली, जी मार्च २०२३ मधील १३,३९४ युनिट्सच्या वार्षिक विक्रीच्या तुलनेत १८.६७ टक्क्यांची वाढ आहे.
Hyundai Aura
Hyundai ची Aura यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. जिच्या ४,८८३ युनिट्सची विक्री झाली. मार्च २०२३ मध्ये विकल्या गेलेल्या ३,७७४ युनिटच्या तुलनेत Hyundai च्या विक्रीत ही २९.३९ टक्क्यांची प्रभावी वाढ आहे. एकूण विकल्या गेलेल्या युनिट्समध्ये Hyundai Aura चा वाटा १५.१० टक्के आहे.
(हे ही वाचा : महिंद्राच्या नव्या SUV कारला देशातील बाजारपेठेत दाखल होण्यापूर्वीच मोठी मागणी; बुकींग सुरु, पाहा किती मोजावे लागणार पैसे )
Honda Amaze
Honda’s Amaze या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याचा हिस्सा ८.२८ टक्के आहे. मार्च २०२४ मध्ये त्याची २,६७८ युनिट्स विकली गेली. मार्च २०२३ मध्ये विकल्या गेलेल्या ३,९९६ युनिट्सच्या तुलनेत, अमेझच्या विक्रीत वर्षानुवर्षे ३२.९८ टक्क्यांनी घट झाली आहे.
Tata Tigor/EV
Tata Tigor/EV ने मार्च २०२४ मध्ये २,०१७ युनिट्स विकल्या, जे मार्च २०२३ मध्ये विकल्या गेलेल्या २,७०५ युनिट्सच्या तुलनेत वर्ष-दर-वर्षाच्या विक्रीत २५.४३ टक्क्यांची घट आहे. ही कार गेल्या महिन्यातील मार्केट शेअरमध्ये ६.२४ टक्क्यांसह चौथ्या स्थानावर आहे.
Volkswagen Virtus
यादीतील पाचवी कार Volkswagen Virtus आहे. मार्च २०२४ मध्ये त्याची १,८४७ युनिट्स विकली गेली आहेत. वार्षिक आधारावर विक्रीत ३.०७ टक्के वाढ झाली आहे. कारण, गेल्या वर्षी याच महिन्यात १,७९२ मोटारींची विक्री झाली होती. मार्च २०२४ च्या एकूण विक्रीत त्याचा वाटा ५.७१ टक्के होता.