Top 6 CNG Cars In India Under 10 Lakhs: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आता देशात CNG कारची मागणी खूप वाढली आहे. सीएनजी कार चांगला पर्याय ठरू शकते. कार कंपन्यांनीही आता अधिकाधिक सीएनजी कार बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. तुम्ही जर सीएनजी कार घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला १० लाखांच्या आत मिळणाऱ्या ६ सीएनजी कारबाबत सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला कार घेणे सोपे जाईल.

10 लाखांच्या बजेटमध्ये येणाऱ्या ‘या’ आहेत टॉप CNG कार

Maruti Suzuki Swift CNG

IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
Uber driver gets review as a good kisser from customer post viral on social Media
“चांगला किस करणारा”, ड्रायव्हरचा असा रिव्ह्यू तुम्ही कधीच ऐकला नसेल, ‘या’ व्हायरल पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय
jsw e cars marathi news
‘जेएसडब्ल्यू‘कडून सात लाख ई-मोटार निर्मितीचे उद्दिष्ट, प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून मंजुरी
MG Select shares first look of mg cyberster with electric cissor doors
महागड्या स्पोर्ट्स कारला देणार टक्कर! ‘या’ कंपनीने नव्याकोऱ्या कारचा पहिला लूक केला शेअर, इलेक्ट्रिक डोअर्ससह मिळतील खास फिचर्स
Nearly 90000 Honda Elevate Suvs Sold Since Launch, See This Details Honda Elevate Suvs price details
वर्षभरात तब्बल ९० हजार ग्राहकांनी खरेदी केली होंडाची ‘ही’ एसयूव्ही कार; जाणून घ्या काय आहे एवढं खास

स्विफ्ट ही भारतीय कार बाजारातील बेस्ट सेलिंग कार आहे. छोटे आकार, आकर्षक डिजाईन आणि चांगल्या मायलेजमुळे Maruti suzuki swift कार ग्राहकांना भुरळ घालते. या कारच्या सीएनजी व्हेरिएंटमध्ये १.२ लिटर, फोर सिलेंडर ड्युअल जेट इंजिन मिळते, जे ८९ पीएसची शक्ती आणि ११३ एनएमचा टॉर्क निर्माण करते. मात्र सीएनजीवर चालताना शक्ती कमी मिळते. सीएनजीवर चालत असताना कार ७७.४९ पीएसची शक्ती आणि ९८.५ एनएमचा टॉर्क निर्माण करते. ही सीएनजी कार प्रति किलो ३०.९० किलोमीटरचा मायलेज देते, असा कंपनीचा दावा आहे. सीएनजी पावरट्रेन मॅन्युअल गेयरबॉक्ससह व्हीएक्सआय आणि झेडएक्सआयमध्ये मिळते. कारची किंमत ७.७ लाखांपासून (एक्स शोरूम) सुरू होते.

(हे ही वाचा : Maruti Suzuki च्या ‘या’ SUV चे ग्राहकांना लागले वेड, झाली बंपर बुकींग )

Tata Tiago NRG iCNG

Tata tiago icng ही टाटाच्या वाहनांच्या ताफ्यातील सर्वात परडवणारी कार आहे. कारमध्ये १.२ लिटर ३ सिलेंडर रिवोट्रोन इंजिन देण्यात आले आहे, जे ८६ पीएसची सर्वाधिक शक्ती आणि ११३ एनएमचा पीक टॉर्क निर्माण करते. सीएनजीमध्ये शक्ती घटून ७३ पीए आणि टॉर्क घटून ९५ एनएम होतो. कार प्रति किलो सीएनजी इंधनावर २६.४९ किलोमीटरचा मायलेज देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. कार ४ व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. सीएनजी टियागोची किंमत ६.३० ते ७.८२ लाखांपर्यंत (एक्सशोरूम) आहे.

Hyundai grand i10 nios

Hyundai grand i10 nios मध्ये १.२ लिटर ५ सिलिंडर इंजिन मिळते जे ८३ पीएसची सर्वाधिक शक्ती आणि ११३ एनएमचा पीक टॉर्क निर्माण करते. सीएनजीवर चालत असताना शक्ती घटून ६८ बीएचपी होते आणि ९५ एनएमचा टॉर्क मिळते. ही कार मॅग्ना, स्पोर्ट्झ, अस्ता या तीन व्हेरिएंटमध्ये मिळते. स्पोर्ट्झची किंमत ७.७० लाख (एक्स शोरूम) असून अस्ता व्हेरिएंटची किंमत ८.४५ लाख आहे.

Maruti Dzir CNG

डिझायर ही सर्वात लोकप्रिय कॉम्पॅक्ट सिडान कार आहे. Maruti suzuki dzire cng कारमध्ये ड्युअल जेट इंजिन देण्यात आले आहे, जे ८९ पीएसची सर्वाधिक शक्ती आणि ११३ एनएमचा टॉर्क निर्माण करते. सीएनजीवर चालताना ७७.४९ पीएसची शक्ती आणि ९८.५ एनएमचा टॉर्क मिळतो. कार प्रति किलो सीएनजी इंधनावर ३१.१२ किमी मायलेज देते. कार व्हीएक्सआय आणि झेडएक्सआय या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. कारची किंमत ८.२३ लाख ते ८.९१ लाखांदरम्यान (एक्सशोरूम) आहे.

(हे ही वाचा : Maruti Vitara Brezza ५ लाखात खरेदी करा, सोबत एक वर्षाची वॉरंटी, ३ फ्री सर्विस सेवा आणि मिळेल… )

Hyundai Aura CNG

ग्रँड आय १० एनआयओएसमध्ये जे इंजिन देण्यात आले आहे तेच hyundai aura cng कारमध्ये देण्यात आले आहे. हे इंजिन ८३ पीएसची सर्वाधिक शक्ती आणि ११३ एनएमचा पीक टॉर्क देते. सीएनजीवर चालताना ६८ बीएचपीची शक्ती आणि ९५ एनएमचा टॉर्क मिळते. ह्युंडाई ऑरा सीएनजी ही एस आणि एसएक्स या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. एसची किमत ६.०९ लाख, तर एसएक्सची किंमत ८.५७ लाख (एक्स शोरूम) आहे.

Tata Tigor iCNG

टाटा टिगोर फॅक्टरी फिटेड सीएनजी किटसह उपलब्ध करण्यात आली आहे. टीआगो आयसीएनजीमध्ये जे इंजिन देण्यात आले आहे तेच या कारमध्ये देण्यात आले आहे. १.२ लिटर इंजिन पेट्रोल इंधनावर ८६ पीएसची शक्ती आणि ११३ एनएमचा टॉर्क निर्माण करते, तर सीएनजीवर ७३ पीएसची शक्ती आणि ९५ एनएमचा टॉर्क निर्माण करते. कार एक्सएम, एक्सझेड आणि एक्सझेड प्लस या तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. कारची किंमत ७.४० लाख (एक्सशोरूम) ते ८.५९ लाखांपर्यंत आहे.

आता वरिल माहितीच्या आधारे तुम्ही ठरवा, कोणती CNG कार असेल तुमच्यासाठी खास

Story img Loader