Top 6 cng cars under 10 lack : महागड्या इंधनामुळे ग्राहक आता सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारकडे वळले आहेत. या कार्स इंधनावर मोठी बचत करतात आणि चांगले मायलेज देतात. त्यामुळे त्या लोकप्रिय होत आहेत. इलेक्ट्रिक कार रेंजच्या बाबतीत चांगली असली तरी देशात चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे तेवढे नाही. त्यामुळे ग्राहक या कार घेताना विचार करतात. अशात सीएनजी कार चांगला पर्याय ठरू शकते.

सीएनजी कार पेट्रोल डिजेल कारपेक्षा अधिक मायलेज देते. सीएनजी संपल्यास पेट्रोलवर कार चालवता येत असल्याने तिला कुठेही घेऊन जाणे सोयिस्कर ठरते. तुम्ही जर सीएनजी कार घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला १० लाखांच्या आत मिळणाऱ्या ६ सीएनजी कार्सबाबत माहिती देत आहोत. या कार तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतात.

shukra guru gochar 2024 in dhanu vrushabha astrology
७ नोव्हेंबरनंतर ‘या’ तीन राशींचे नशीब उजळणार, गुरु शुक्राच्या राशी बदलाने मिळणार भरपूर सुख अन् आर्थिक लाभ
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
Oben Electric confirms Rorr EZ Launch Date
Oben Electric Rorr EZ : आता बदलतं तापमान सहन करणार तुमची इलेक्ट्रिक बाईक; ‘या’ दिवशी होणार लाँच, पाहा कसे असतील फीचर्स
traffic e-challan
ई-चलन घोटाळ्यापासून सावध रहा! ट्रॅफिक चलनच्या नावाखाली होतेय फसवणूक, कसे टाळावे?
ketu nakshatra parivartan 2024
१० नोव्हेंबरपासून ‘या’ ३ राशी कमावणार नुसता पैसा; केतूचे नक्षत्र परिवर्तन २०२५ पर्यंत करणार मालामाल
4th November 2024 Rashi Bhavishya
४ नोव्हेंबर पंचांग : पूर्वाषाढा नक्षत्रात वृषभ,कर्कसह ‘या’ ३ राशींचा आनंदित जाईल दिवस; कामात यश ते गोड बातमी मिळणार; वाचा तुमचे राशिभविष्य
Petrol And Diesel Rates In Marathi
Petrol Diesel Rates : महाराष्ट्रात कमी झाले का पेट्रोल-डिझेलचे दर? तुमच्या शहरांत काय आहे इंधनाची किंमत? जाणून घ्या

(लवकरच लाँच होणार ‘या’ छोट्या कार, बाजारात घालणार धुमाकूळ)

१) मारुती सुझुकी स्विफ्ट

स्विफ्ट ही भारतीय कार बाजारातील बेस्ट सेलिंग कार आहे. छोटे आकार, आकर्षक डिजाईन आणि चांगल्या मायलेजमुळे Maruti suzuki swift कार ग्राहकांना भुरळ घालते. या कारच्या सीएनजी व्हेरिएंटमध्ये १.२ लिटर, फोर सिलेंडर ड्युअल जेट इंजिन मिळते, जे ८९ पीएसची शक्ती आणि ११३ एनएमचा टॉर्क निर्माण करते. मात्र सीएनजीवर चालताना शक्ती कमी मिळते. सीएनजीवर चालत असताना कार ७७.४९ पीएसची शक्ती आणि ९८.५ एनएमचा टॉर्क निर्माण करते. ही सीएनजी कार प्रति किलो ३०.९० किलोमीटरचा मायलेज देते, असा कंपनीचा दावा आहे. सीएनजी पावरट्रेन मॅन्युअल गेयरबॉक्ससह व्हीएक्सआय आणि झेडएक्सआयमध्ये मिळते. कारची किंमत ७.७ लाखांपासून (एक्स शोरूम) सुरू होते.

२) टाटा टियागो आयसीएनजी

Tata tiago icng ही टाटाच्या वाहनांच्या ताफ्यातील सर्वात परडवणारी कार आहे. कारमध्ये १.२ लिटर ३ सिलेंडर रिवोट्रोन इंजिन देण्यात आले आहे, जे ८६ पीएसची सर्वाधिक शक्ती आणि ११३ एनएमचा पीक टॉर्क निर्माण करते. सीएनजीमध्ये शक्ती घटून ७३ पीए आणि टॉर्क घटून ९५ एनएम होतो. कार प्रति किलो सीएनजी इंधनावर २६.४९ किलोमीटरचा मायलेज देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. कार ४ व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. सीएनजी टियागोची किंमत ६.३० ते ७.८२ लाखांपर्यंत (एक्सशोरूम) आहे.

(फोर्सने सादर केली दमदार URBANIA VAN, जाणून घ्या आसन क्षमता आणि किंमत)

३) ह्युंडाई ग्रँड आय १० एनआयओएस

Hyundai grand i10 nios मध्ये १.२ लिटर ५ सिलिंडर इंजिन मिळते जे ८३ पीएसची सर्वाधिक शक्ती आणि ११३ एनएमचा पीक टॉर्क निर्माण करते. सीएनजीवर चालत असताना शक्ती घटून ६८ बीएचपी होते आणि ९५ एनएमचा टॉर्क मिळते. ही कार मॅग्ना, स्पोर्ट्झ, अस्ता या तीन व्हेरिएंटमध्ये मिळते. स्पोर्ट्झची किंमत ७.७० लाख (एक्स शोरूम) असून अस्ता व्हेरिएंटची किंमत ८.४५ लाख आहे.

४) मारुती सुझुकी डिझायर सीएनजी

डिझायर ही सर्वात लोकप्रिय कॉम्पॅक्ट सिडान कार आहे. Maruti suzuki dzire cng कारमध्ये ड्युअल जेट इंजिन देण्यात आले आहे, जे ८९ पीएसची सर्वाधिक शक्ती आणि ११३ एनएमचा टॉर्क निर्माण करते. सीएनजीवर चालताना ७७.४९ पीएसची शक्ती आणि ९८.५ एनएमचा टॉर्क मिळतो. कार प्रति किलो सीएनजी इंधनावर ३१.१२ किमी मायलेज देते. कार व्हीएक्सआय आणि झेडएक्सआय या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. कारची किंमत ८.२३ लाख ते ८.९१ लाखांदरम्यान (एक्सशोरूम) आहे.

५) ह्युंडाई ऑरा सीएनजी

ग्रँड आय १० एनआयओएसमध्ये जे इंजिन देण्यात आले आहे तेच hyundai aura cng कारमध्ये देण्यात आले आहे. हे इंजिन ८३ पीएसची सर्वाधिक शक्ती आणि ११३ एनएमचा पीक टॉर्क देते. सीएनजीवर चालताना ६८ बीएचपीची शक्ती आणि ९५ एनएमचा टॉर्क मिळते. ह्युंडाई ऑरा सीएनजी ही एस आणि एसएक्स या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. एसची किमत ६.०९ लाख, तर एसएक्सची किंमत ८.५७ लाख (एक्स शोरूम) आहे.

(वाहनासाठी फॅन्सी क्रमांक हवा आहे? फॉलो करा ‘या’ स्टेप्स)

६) टाटा टिगोर आयसीएनजी

टाटा टिगोर फॅक्टरी फिटेड सीएनजी किटसह उपलब्ध करण्यात आली आहे. टीआगो आयसीएनजीमध्ये जे इंजिन देण्यात आले आहे तेच या कारमध्ये देण्यात आले आहे. १.२ लिटर इंजिन पेट्रोल इंधनावर ८६ पीएसची शक्ती आणि ११३ एनएमचा टॉर्क निर्माण करते, तर सीएनजीवर ७३ पीएसची शक्ती आणि ९५ एनएमचा टॉर्क निर्माण करते. कार एक्सएम, एक्सझेड आणि एक्सझेड प्लस या तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. कारची किंमत ७.४० लाख (एक्सशोरूम) ते ८.५९ लाखांपर्यंत आहे.