Year Ender Top Auto Launched 2024 : नवीन वर्ष सुरू व्हायला अवघे काही दिवसच बाकी राहिले आहेत. अशातच सरत्या वर्षाकडे पाहता कारप्रेमींसाठी २०२४ हे वर्ष खूप खास राहिलं आहे. कारण या वर्षी अनेक लोकप्रिय कार, बाईक लाँच करण्यात आल्या आहेत. अशातच काही कंपन्यांनी बऱ्याच वर्षांनी त्यांचे लोगोसुद्धा बदलले आहेत. यात २०२४ मध्ये नवीन कार लाँच झालेल्या लिस्टमध्ये अनेक कार आणि बाईकचासुद्धा समावेश आहे (Top Auto Launched 2024). या कार आणि बाईकमध्ये टॉप पाच कार किंवा बाईक नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात…
१. होंडा अमेझ (Honda Amaze)
होंडा कार्स इंडियाने लोकप्रिय सेडान अमेझचे थर्ड जनरेशन मॉडेल लाँच केले. या मॉडेलची किंमत आठ लाखांपासून ते १०.९० लाख रुपयांपर्यंत आहे. होंडा अमेझ व्ही (V), व्हीएक्स (VX) व झेडएक्स (ZX) या तीन व्हेरिएंट्, तर रेडियंट रेड मेटालिक, ऑब्सिडियन ब्ल्यू पर्ल, गोल्डन ब्राउन मेटॅलिक, मेटिओरॉइड ग्रे मेटॅलिक, लुनर सिल्व्हर मेटॅलिक व प्लॅटिनम व्हाइट पर्ल आदी सहा रंगांमध्ये उपलब्ध असेल. लेन कीप असिस्ट, रोड डिपार्चर मिटिगेशन, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, कोलिजन मिटिगेशन ब्रेकिंग सिस्टीम, ऑटो हाय बीम व लीड कार डिपार्चर नोटिफिकेशन सिस्टीम, सेग्मेंट-फर्स्ट लेनवॉच कॅमेरा, सहा एअरबॅग्ज, हिल स्टार्ट असिस्ट, व्हेईकल स्टॅबिलिटी असिस्ट व रिअर पार्किंग सेन्सर्स, मल्टी-एंगल रिअर पार्किंग कॅमेरा, ISOFIX अँकरेज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन व इमर्जन्सी स्टॉप सिग्नल आदी फीचर्स होंडा अमेझमध्ये देण्यात आले आहेत.
२. महिंद्रा बीई ६ई ( Mahindra BE 6e)
देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी महिंद्राने गेल्या महिन्यात एक नाही, तर दोन नवीन इलेक्ट्रिक कार बीई ६ई (BE 6e) आणि एक्सईव्ही ९ई (XEV 9e) लाँच केल्या आहेत. बीई ६ईमध्ये MAIA ब्लूटूथ ५.२ आणि वाय-फाय ६.०, कनेक्टिव्हिटी व रिअल-टाइम अपडेट्स सक्षम करणारे Quectel 5G, इन्फोटेन्मेंट आणि इन्स्ट्रुमेंट कन्सोलसाठी ड्युअल स्क्रीन, युजर्स डॉल्बी ॲटमॉससह १६ स्पीकर हर्मन कार्डन साऊंड सिस्टीम, लार्ज इन्फिनिटी रूफ, मागे बसणारे प्रवासी पुढील सीटच्या मागील बाजूस प्रदान केलेल्या कारमधील इन्फोटेन्मेंट स्क्रीनसह प्रवासाचा आनंद घेऊ शकतात. Mahindra BE 6e मध्ये सेफ्टी किट उपलब्ध आहेत. त्यामध्ये ADAS लेव्हल २ + सिस्टीम ५ radars आणि १ व्हिजन कॅमेरा आहे. एसयूव्हीमध्ये बसून तुम्ही रस्त्यावरून जाणारी माणसे, प्राणी, बॅरिकेड्स व विविध प्रकारची वाहने डिटेक्ट करू शकता. ड्रायव्हर थकला आहे का हे ऑक्युपंट मॉनिटरिंग सिस्टीम (DOMS)द्वारे समजले जाऊ शकते. DOMS साठी वापरण्यात आलेला कॅमेरा सेल्फी किंवा व्हिडीओ कॉल्स करण्यासाठीही वापरला जाऊ शकतो. BE 6e मध्ये ३६०° सराउंड व्ह्यू मॉनिटर सिस्टीमदेखील मिळते.
३. रॉयल एनफिल्ड फ्लाइंग फ्ली सी६ (Royal Enfield Flying Flea C6 )
रॉयल एनफिल्डने गेल्या महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या यादीत ग्रँड एन्ट्री घेऊन त्यांची पहिलीवहिली इलेक्ट्रिक बाईक लाँच केली आहे. या बाईकचा लूक लो स्लंग बॉबर मोटरसायकलसारखा असून, त्यामध्ये रेक आऊट फ्रंट, सोलो सॅडल देण्यात आला आहे. यात राउंड शेपचा टचस्क्रीन TFT डिस्प्ले, इन-हाउस बिल्ड सॉफ्टवेअर आहे, जे हवेवर अपडेट केले जाऊ शकते. याशिवाय कॉर्नरिंग एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल, वाहन नियंत्रण युनिटमध्ये २००० हून अधिक राइड मोड कॉम्बिनेशनसह इतर अनेक फीचर देण्यात आली आहेत.
हेही वाचा…आता चिंता सोडा! नवीन Honda Amaze ला मिळेल ‘सीएनजी’चा पर्याय, पण त्यात एक ट्विस्ट?
४. स्कोडा कायलाक (Skoda Kylaq )
स्कोडा इंडियाने भारतीय बाजारपेठेत नवीन स्कोडा कायलाक (Skoda Kylaq) लाँच केली आहे, ज्याची सुरुवातीची किंमत ७.८९ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. फाइव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेली ही गाडी २५ पेक्षा जास्त सुरक्षा फीचर्ससह डिझाईन करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक सनरूफ, ४४६ लिटर बूट स्पेस, १७-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील, १० इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम, आठ इंचांचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, सिंगल-पॅनल सनरूफ, एक वायरलेस फोन चार्जर व व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, फ्रंटच्या दोन्ही सीट तुम्ही सहा पद्धतीने इलेक्ट्रिकली ॲडजेस्ट करू शकणार आहात. स्कोडा लाइनअपमधील ही सर्वांत परवडणारी एसयूव्ही आहे आणि ती फक्त पेट्रोलवर उपलब्ध असेल. या गाडीला एक लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे आणि मॅन्युअल, ऑटोमॅटिक ट्रान्स्मिशन अशा पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
५. नवीन जनरेशन मारुती डिझायर २०२४ (New Maruti Dzire 2024)
मारुती सुझुकी कंपनीने गेल्या महिन्यात कॉम्पॅक्ट सेडान कार सेगमेंटमध्ये नवीन जनरेशन ‘मारुती डिझायर २०२४’ लाँच केली आहे. याची किंमत ६.७९ लाख रुपयांपासून सुरू होते आणि १०.१४ लाख रुपयांपर्यंत जाते. डिझायरच्या CNG प्रकारांची किंमत रु. ८.७४ लाख आणि रु. ९.७४ लाख रुपये आहे (सर्व किमती एक्स-शोरूम). यामध्ये नऊ इंची इन्फोटेनमेंट सिस्टीम, अँड्रॉइड ऑटो, ॲपल कार प्ले, १६ इंच अलॉय व्हील, एलईडी डीआरएल, एलईडी लाइट्स, एलईडी फॉग लॅम्प, बॉडी कलर बंपर, हाय माऊंट एलईडी स्टॉप लॅम्प, शार्क फिन अँटेना, फ्रंट फूटवेल इल्युमिनेशन, लेदर रॅप्ड स्टीयरिंग आहे. व्हील, ड्युअल टोन इंटिरियर्स, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, ३६० डिग्री व्ह्यू कॅमेरा, टीपीएमएस, सनरूफ, क्रूझ कंट्रोल, वायरलेस चार्जर, पुश बटन स्टार्ट/स्टॉप, ऑटो हेडलॅम्प, रिअर एसी व्हेंट, डिजिटल एसी पॅनेल, सुझुकी कनेक्ट, दोन ॲक्सेसरीज पॅकेजही दिले आहेत.
जॅग्वार आणि ऑडी न्यू लोगो (Jaguar & Audi New Logo)
लक्झरी कारसाठी ओळखल्या जाणाऱ्या जॅग्वार कंपनीने त्यांचा आयकॉनिक लोगोमध्ये तब्बल १०२ वर्षांनी बदल केला आहे. आत्तापर्यंत कंपनीने जगभरात विविध प्रकारचे मॉडल जारी केले आहेत. आता कंपनी २०२६ साली संपूर्णपणे इलेक्ट्रिक कार निर्माता म्हणून बाजारात उतरण्याची तयारी करत आहे, त्यामुळे कंपनीने त्यांचा आयकॉनिक लोगो बदलला आहे.
लक्झरी कारसाठी ओळखल्या जाणाऱ्या जर्मन कार उत्पादक ऑडीने चीनमध्ये आपला आयकॉनिक फोर-रिंग लोगो बदलला आहे. चीनच्या बाजारात ऑडीने ‘ई कॉन्सेप्ट स्पोर्ट्सबॅक कार’ उतरवली आहे. तिच्यावर हा लोगो गायब असून केवळ ‘AUDI’ अशी इंग्रजी अक्षरे दिसत आहे. नवीन AUDI लोगो जगातील सर्वात मोठ्या ऑटो मार्केटमध्ये तरुण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बदलला असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. तर २०२४ मध्ये ऑटो एक्स्पोमध्ये हे बदल दिसले आणि या गाड्या लाँच झाल्या आहेत (Top Auto Launched 2024).