सध्या देशभरात फोर व्हिलर खरेदी करण्याकडे लोकांचा कल जास्त आहे. कारण देशातील बाजारपेठेमध्ये विक्री झालेल्या फेब्रुवारी २०२३ या महिन्याचा अहवाल हा ऑटो क्षेत्रातील कार उत्पादक कंपन्यांनी जाहीर केला आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये ३.३५ लाख इतक्या वाहनांच्या युनिट्सची विक्री झाली आहे. जी मागच्या वर्षीच्या तुलनेत १०.६ टक्क्यांनी वाढली आहे. या महिन्यात सर्वच सेगमेंटमध्ये सकारात्मक वाढ नोंदवली गेली आहे.

या विक्रीमध्ये सर्वात जास्त वर्चस्व हे SUV सेगमेंटचे राहिले आहे. ज्यामध्ये आज आपण टॉप बेस्ट ५ सेलिंग SUV बद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांची फेब्रुवारी २०२३ या महिन्यात सर्वाधिक विक्री झाली आहे.

Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
honda and nissan merging plan
बड्या जपानी मोटारकंपनीला घरघर… होंडा-निस्सानने विलिनीकरणचा पर्याय का निवडला?
Maruti suzuki sold most cars this year than hyundai tata and Mahindra check details
टाटा, महिंद्रा आणि ह्युंदाईची बोलती बंद! यावर्षी एकट्या मारुतीने केली सर्वाधिक कारची विक्री, आकडे पाहून व्हाल थक्क
Mukesh Ambanis daughter Isha Ambani spotted with colour-changing luxury SUV it is worth Rs 4 core
मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानीकडे आहे सरड्यासारखी रंग बदलणारी कार! किंमत ऐकून बसेल धक्का….
RTO officials fined over 40 Dombivli rickshaw drivers between 5,000 to 20,000 rupees.
डोंबिवलीत १२५ हून अधिक रिक्षा चालकांची ‘आरटीओ’कडून तपासणी, ४० हून अधिक रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई

हेही वाचा : वाहन उद्योगांचे अच्छे दिन; फेब्रुवारी महिन्यात झाली ‘इतक्या’ लाख वाहनांची विक्री, ‘या’ आहेत टॉप कंपन्या

एका आकडेवारीनुसार फेब्रुवारी महिन्यात मारुती सुझुकी Brezza ने टाटा Nexon ला मागे टाकून सर्वाधिक विक्रीच्या यादीत पहिले स्थान मिळवले आहे. Tata Nexon फेब्रुवारीमध्ये दुसरी सर्वाधिक विक्री होणारी SUV बनली आहे. तिसऱ्या क्रमांकावर Tata पंच, चौथ्या क्रमांकावर Hyundai Creta आणि Hyundai Venue पाचव्या क्रमांकावर आहे.

Maruti Suzuki Brezza

फेब्रुवारी २०२३ मध्ये मारुती सुझुकी कंपनीची ब्रेझा ही सर्वाधिक विक्री होणारी SUV ठरली आहे. ही एक सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. मारुती सुझुकीने या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची ७१ टक्क्यांच्या वाढीसह १५,७८७ युनिट्सची विक्री केली आहे.

Tata Nexon

Tata Nexon ही फेब्रुवारी २०२३ मधील सर्वाधिक विक्री होणारी दुसरी SUV कार आहे. जी अनेक महिन्यांपासून पहिल्या स्थानावर होती. Tata Motors ने फेब्रुवारीमध्ये या SUV च्या १३,९१४ युनिट्सची विक्री केली आहे. ज्यासह कंपनीने एका वर्षात या SUV च्या विक्रीत १४ टक्कयांनी वाढ मिळवली आहे.

Tata Punch

Tata Punch ही कार फेब्रुवारी महिन्यात तिसरी सर्वाधिक विक्री होणारी SUV आणि या यादीतील Tata Motors मधील दुसरी SUV आहे. ज्याने एका वर्षात विक्रीमध्ये १६ टक्क्यांनी वाढ मिळवली आहे. टाटाने फेब्रुवारी २०२३ मध्ये टाटा पंच या एसयूव्हीच्या ११,१६९ युनिट्सची विक्री केली आहे.

हेही वाचा : दरमहिना भरा फक्त १२ हजार अन् घरी घेऊन जा जबरदस्त मायलेज देणारी ६ लाखांची ‘ही’ कार

Hyundai Creta

फेब्रुवारी २०२३ या महिन्यात सर्वाधिक विरक्ती होणाऱ्या एसयूव्हीमध्ये चौथ्या स्थानावर आहे ती म्हणजे ह्युंदाई कंपनीची Creta ही कार. जी गेले कित्येक महिन्या दुसऱ्या स्थानावर होती. फेब्रुवारी महिन्यात ह्युंदाई मोटर्सने क्रेटाच्या १०,४२१ युनिट्सची विक्री केली आहे. मागच्या ही संख्या ९,६०६ युनिट्स इतकी होती. ह्युंदाई क्रेटा ने एका वर्षात विक्रीमध्ये ८ टक्क्यांची वाढ प्राप्त केली आहे.

Hyundai Venue

Hyundai Venue फेब्रुवारी २०२३ च्या टॉप ५ सेलिंग SUV मध्ये पाचव्या स्थानावर आहे. ज्यांची कंपनीने या महिन्यात ९,९९७ युनिट्सची विक्री करू शकली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात १०,२१२ युनिट्सची विक्री केली होती. म्हणजेच या एसयूव्हीच्या विक्रीत यंदा २ टक्क्यांनी घट झाली असली तरी या एसयूव्हीने ५ वे स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे.

Story img Loader