Best Selling Electric Scooter in May 2024: पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक टू व्हीलरची मागणी झपाट्याने वाढत आहे. वाहन कंपन्या दररोज नवनवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स बाजारात आणत आहेत. भारतात इलेक्ट्रिक टू व्हीलर मार्केट खूप वेगाने वाढत आहे. अनेक कंपन्या आता आपले प्रोडक्ट मार्केटमध्ये उतरवत आहे. ओला इलेक्ट्रिक, टीव्हीए, एथर एनर्जी, ओकिनावा, हिरो इलेक्ट्रिक आणि एम्पियर सारख्या कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंट मध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. मे महिन्यातही इलेक्ट्रिक स्कूटरची प्रचंड विक्री झाली आहे. आज आपण मे महिन्यात कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटरची सर्वाधिक विक्री झाली ते पाहूया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री चांगलीच झाली होती. नवीन ई-वाहन धोरणाच्या अंमलबजावणीनंतर, इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी कमी करण्यात आली आहे, तरीही इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये लोकांचा उत्साह कायम आहे. Ola Electric, TVS, Bajaj, Ather आणि Hero MotoCorp हे मे २०२४ मध्ये देशात सर्वाधिक विकले जाणारे ब्रँड होते. ओला इलेक्ट्रिकने गेल्या महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटरच्या ३७,१९१ युनिट्सची विक्री केली आहे. तर मार्च २०२४ मध्ये कंपनीने सर्वाधिक ५३,००० युनिट्सची विक्री नोंदवली होती. ओलाने मे २०२४ मध्ये सर्वाधिक विक्री करुन पहिला क्रमांक पटकाविला आहे.

(हे ही वाचा: Maruti Swift चा खेळ संपणार? टाटाने खेळला नवा गेम; आणली देशातील पहिली प्रीमियम हॅचबॅक कार, बुकींगही सुरु, किंमत…)

ओला इलेक्ट्रिक नंतर, TVS दुसऱ्या क्रमांकावर आली आहे जी बाजारात आपली iQube इलेक्ट्रिक स्कूटर विकत आहे. TVS ने गेल्या महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटरच्या ११,७३७ युनिट्सची विक्री केली आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये कंपनीचा हिस्सा १८.४२ टक्के आहे तर ओला इलेक्ट्रिकचा वाटा ४९ टक्के आहे. बजाज बद्दल बोलायचे झाले तर कंपनी चेतकचे इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल घेऊन बाजारात आहे.

बजाज चेतकने गेल्या महिन्यात ९,१८९ युनिट्सची विक्री केली आहे आणि यासह कंपनीने १४.४२ टक्के मार्केट शेअरचा दावा केला आहे. बजाज ऑटो चेतकचे दोन प्रकार – अर्बन आणि प्रीमियम विकत आहे, ज्यांना बाजारात प्रचंड मागणी आहे. कंपनीने चेतक इलेक्ट्रिक स्कूटरच्या डीलरशिपचा भारतातील १६४ शहरांमध्ये विस्तार केला आहे.

मे महिन्यात सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटर विकणारी चौथी कंपनी एथर एनर्जी होती ज्याने ६,०२४ युनिट्सची विक्री नोंदवली. यासह, Ather चा बाजार हिस्सा ९.४५ टक्क्यांवर पोहोचला आहे. हिरो मोटोकॉर्प आपल्या विडा इलेक्ट्रिक स्कूटरच्या २,४५३ युनिट्सच्या विक्रीसह पाचव्या स्थानावर राहिली. मे २०२४ मध्ये भारतात एकूण ७५,५०० इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री झाली. यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर तसेच इलेक्ट्रिक मोटरसायकलचा समावेश आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top best selling ev ola electric completed 37191 scooter registrations in may 2024 pdb