Cars Discontinued In 2023: २०२३ हे वर्ष भारतीय कार बाजारासाठी खूप चांगले वर्ष ठरले आहे. यावर्षी (जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ पर्यंत) ४० लाखांहून अधिक कार विकल्या जातील असा अंदाज आहे. २०२३ या वर्षात डझनभर नवीन गाड्या बाजारात आल्या पण या अनेक गाड्यांनी भारतीय कार बाजाराचा निरोप घेतला आहे. यामध्ये मारुती सुझुकीच्या कारचा देखील समावेश आहे, जी कंपनीची एंट्री लेव्हल हॅचबॅक होती. २०२३ मध्ये बंद होणार्या ५ कारबद्दल आज आपण जाणून घेऊया…
बरीच वर्षे मार्केट गाजवणाऱ्या ‘या’ कारची विक्री बंद!
Maruti Alto 800
मारुती सुझुकीच्या लोकप्रिय हॅचबॅक कार अल्टो 800 चा प्रवास आता संपला आहे. बऱ्याच काळापासून अल्टो ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी कार होती. Maruti Suzuki Alto 800 ची शेवटची रेकॉर्ड केलेली किंमत रु. ३.५४ लाख ते रु. ५.१३ लाख होती. हे ०.८ लीटर पेट्रोल इंजिनसह उपलब्ध होते, त्यासोबत ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि सीएनजीचा पर्यायही होता. हे पहिल्यांदा २०१२ मध्ये सादर करण्यात आले होते.
Honda Jazz
बरीच वर्षे मार्केट गाजवणाऱ्या Honda Jazz भारतातील विक्री बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. Honda Jazz ची शेवटची रेकॉर्ड केलेली किंमत रु. ८.०१ लाख ते रु. १०.३२ लाख होती. हे १.२-लीटर पेट्रोल इंजिनसह उपलब्ध होते. त्यासोबत ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन/CVT पर्याय होता. हे पहिल्यांदा २००९ मध्ये सादर करण्यात आले होते.
(हे ही वाचा: खरेदी करायचीय नवीन CNG कार? Maruti, Tata, Hyundai च्या कारसह ‘या’ गाड्या ‘इतक्या’ स्वस्त, एकीची किंमत फक्त…)
Honda WR-V
Honda WR-V ची शेवटची नोंद केलेली किंमत रु. ९.११ लाख ते रु. १२.३१ लाख होती. यात १.२-लिटर पेट्रोल (5-MT) आणि १.५-लिटर डिझेल इंजिन (६-MT) पर्याय होते. हे पहिल्यांदा २०१७ मध्ये सादर करण्यात आले होते आणि २०२३ मध्ये बंद करण्यात आले.
Honda City 4th-generation
या कारची शेवटची नोंद केलेली किंमत ९.५० लाख ते १० लाख रुपये होती. यात १.५-लिटर पेट्रोल इंजिन होते. हे २०१४ मध्ये लाँच करण्यात आले होते. सध्या, पाचव्या पिढीची होंडा सिटी विक्रीसाठी उपलब्ध आहे.
Nissan Kicks
या कारची शेवटची रेकॉर्ड केलेली किंमत ९.५० लाख ते १४.९० लाख रुपये होती. यात १.५-लीटर पेट्रोल (५-MT)/१.३-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन (MT/CVT) चा पर्याय आहे. हे २०१९ मध्ये सादर केले गेले. ही क्रेटा सेगमेंटची एसयूव्ही होती.