Best Selling SUV Car: देशातील बाजारपेठेत एसयूव्ही (SUV) कारची मागणी वाढतच चालली आहे. आता एसयूव्ही हा देशातील सर्वाधिक मागणी असलेला कार सेगमेंट झाला आहे आणि प्रत्येक नवीन उत्पादनासह या विभागाची लोकप्रियता वाढत चालली आहे हे सर्वांना माहीत आहे. एसयूव्ही कार बरोबरच लोकं स्वस्त आणि सुरक्षित कार शोधत असतात आणि या कारचीही विक्री जोरातच होत असते. यातच नोव्हेंबर २०२३ मध्ये दोन एसयूव्ही कारचा बोलबाला पाहायला मिळाला आहे.

Tata Nexon ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय सब-कॉम्पॅक्ट SUV आहे. हे स्टायलिश डिझाइन, अनेक इंजिन पर्याय आणि उत्कृष्ट वैशिष्ट्यांसाठी ओळखले जाते. नेक्सॉन पहिल्यांदा २०१७ मध्ये लाँच करण्यात आली होती आणि तेव्हापासून ते सातत्याने भारतीय बाजारपेठेत आपली लोकप्रियता कायम ठेवत आहे. यामध्ये सर्वात मोठे योगदान म्हणजे कारचे ५-स्टार सुरक्षा रेटिंग. नेक्सॉनला ग्लोबल NCAP द्वारे क्रॅश चाचणीमध्ये ५-स्टार सुरक्षा रेटिंग दिले गेले. त्याचाच परिणाम एसयूव्हीच्या विक्रीवर दिसून आला, या कारच्या विक्रीत चांगली वाढ झाली असून गेल्या नोव्हेंबर महिन्याबद्दल बोलायचे झाले तर ही सर्वाधिक विक्री होणारी SUV ठरली आहे.

Toyota camry sedan launched in india comes with 9 airbags safety features know its price, performance and mileage
स्कोडाला टक्कर देण्यासाठी टोयोटाची ‘ही’ कार झाली लॉंच, ९ एअरबॅग्सच्या सेफ्टी फिचरसह देणार दमदार परफॉरमन्स, जाणून घ्या किंमत
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Mumbai Kurla Bus Accident marathi news
विश्लेषण : बेस्टच्या दुर्दशेला जबाबदार कोण? कंत्राटी गाड्या आणि चालकांचा प्रयोग कसा फसला?
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
Yamaha NMax 125 Tech Max scooter Details
NMax 125 Scooter :Yamaha ने सादर केली नवीन टेक मॅक्स स्कूटर, बाईकला टक्कर देणारे जबरदस्त फीचर्स; पण भारतात लाँच होणार का?
On Arni Road in Yavatmal near Krishi Nagar speeding car driver ran over pedestrians two wheeler riders and handcarts
यवतमाळ हिट अँड रन प्रकरण, कारने भाजी विक्रेते व दुचाकीस्वारांना उडविले
champions of the earth award madhav gadgil
माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांचा जीवनगौरव
jsw e cars marathi news
‘जेएसडब्ल्यू‘कडून सात लाख ई-मोटार निर्मितीचे उद्दिष्ट, प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून मंजुरी

(हे ही वाचा : Ertiga ची उडाली झोप, ‘ही’ सात सीटर कार घेण्यासाठी मोठी गर्दी; प्रचंड मागणी पाहून कंपनीला बंद करावं लागलं बुकिंग )

नोव्हेंबर २०२३ मध्ये टाटा नेक्सॉनच्या एकूण १४,९१६ युनिट्सची विक्री झाली तर नोव्हेंबर २०२२ मध्ये १५,८७१ युनिट्सची विक्री झाली. म्हणजेच, नेक्सॉनच्या विक्रीत वार्षिक आधारावर ६ टक्क्यांनी घट झाली आहे, परंतु असे असूनही ती सर्वाधिक विक्री होणारी SUV बनण्यात यशस्वी झाली आहे. मारुती ब्रेझा, ह्युंदाई व्हेन्यू, ह्युंदाई क्रेटा इत्यादी सर्व एसयूव्ही विक्रीच्या बाबतीत मागे राहिल्या. तथापि, आणखी एक टाटा एसयूव्ही विक्रीच्या बाबतीत नेक्सॉनच्या अगदी जवळ होती. त्या कारचे नाव टाटा पंच आहे, ज्यापैकी १४,३८३ युनिट्स नोव्हेंबर २०२३ मध्ये विकले गेले. नोव्हेंबर २०२२ मध्ये पंचच्या १२,१३१ युनिट्सची विक्री झाल्यामुळे त्याची विक्री वार्षिक आधारावर १९ टक्क्यांनी वाढली आहे.

टॉप 8 सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV (नोव्हेंबर 2023)

नेक्सॉन आणि पंच नंतर ब्रेझा कार विक्रीच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये त्याची १३,३९३ युनिट्स विकली गेली आहेत. त्यानंतर चौथ्या स्थानावर महिंद्रा स्कॉर्पिओ एन+क्लासिक (१२,१८५ युनिट्स), पाचव्या स्थानावर ह्युंदाई क्रेटा (११,८१४ युनिट्स), सहाव्या स्थानावर किआ सेल्टोस (११,६८४ युनिट्स) आणि सातव्या स्थानावर ह्युंदाई व्हेन्यू (११,१८० युनिट्स) आहे. यानंतर मारुती फ्रॉन्क्स ९,८६७ युनिट्सच्या विक्रीसह आठव्या स्थानावर आहे.

Story img Loader