Top 5 hatchbacks sold in Feb: एकीकडे लोक एसयूव्ही सेगमेंटकडे वळत असताना, हॅचबॅक सेगमेंटलाही पसंती देणारा अजूनही मोठा वर्ग देशात आहे. हॅचबॅक कार आकाराने लहान असल्याने पार्क करणे सोपे असते, त्यामुळे पहिली कार खरेदी करताना बहुतांश लोक हॅचबॅक कारला पसंती देतात. शिवाय त्या खिशालाही परवडणाऱ्या असतात. आज आपण फेब्रुवारी २०२४ मध्ये विकल्या जाणाऱ्या टॉप-५ हॅचबॅक कारची यादी पाहूया. यातील टॉप कारमध्ये बलेनो नाही तर दुसऱ्याच एका कारने यावर आपलं नाव कोरलं आहे.
टॉप-५ हॅचबॅक कार
Maruti Wagon R
मारुती वॅगनआरने फेब्रुवारी २०२४ मध्ये १९ हजार ४१२ युनिट्सची विक्री केली होती तर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये हा आकडा १६ हाजर ८८९ युनिट्स होता. म्हणजेच वर्षानुवर्षे १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये, वॅगन आर ही केवळ सर्वाधिक विक्री होणारी हॅचबॅकच नाही तर सर्वाधिक विक्री होणारी कार देखील होती.
(हे ही वाचा : देशात ‘या’ नव्या ७ सीटर MPV कारच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी, तुफान मागणी पाहून कंपनीला बंद करावं लागलं बुकिंग)
Maruti Baleno
गेल्या महिन्यात १७ हजार ५१७ युनिट्सच्या विक्रीसह मारुती बलेनो दुसऱ्या क्रमांकावर आहे (हॅचबॅक यादीत). या कारची विक्री वार्षिक आधारावर ६ टक्क्यांनी कमी झाली आहे. किंबहुना, गेल्या वर्षी याच कालावधीत या प्रीमियम हॅचबॅकच्या १८ हजार ५९२ युनिट्सची विक्री झाली होती.
Maruti Swift
मारुती सुझुकीने गेल्या महिन्यात देशभरात स्विफ्टच्या १३ हजार १६५ युनिट्सची विक्री केली. वार्षिक आधारावर २८.५ टक्क्याची घट झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत या हॅचबॅकच्या एकूण १८ हजार ४१२ युनिट्सची विक्री झाली होती.
Maruti Alto
मारुती सुझुकीच्या पोर्टफोलिओमधील अल्टो हे सर्वात जुने हॅचबॅक मॉडेल आहे. कंपनीने गेल्या महिन्यात अल्टोच्या १२ हजार ३९५ युनिट्सची विक्री केली आहे. तथापि, या कारची विक्री वार्षिक आधारावर ४२ टक्क्यांनी कमी झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात अल्टोच्या २१ हजार ४११ मोटारींची विक्री झाली होती.
Tata Tiago
या यादीत टाटा मोटर्सची टियागो पाचव्या क्रमांकावर आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये एकूण ६ हजार ९४७ युनिट्सची विक्री झाली आहे. तथापि, या कारची विक्री देखील वार्षिक आधारावर सुमारे ७ टक्क्यांनी कमी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत एकूण ७ हजार ४५७ युनिट्सची विक्री झाली होती.