Best Cheapest Bikes: भारतीय बाजारामध्ये बाईक्सची डिमांड नेहमी राहिली आहे. कमी किंमत, जबरदस्त मायलेज आणि लो मेंटनेंस असल्याने अशा बाइक्सकची खूप विक्री होते. मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या या बाइक्सला स्टायलिश डिझाइन शिवाय, कमी बजेट मध्ये चांगले आणि दमदार इंजिनसह उपलब्ध करण्यात आले आहे. तुम्ही सुद्धा तुम्हाला परवडणाऱ्या, अल्प दरात उपलब्ध असणाऱ्या बाईक खरेदी करण्याचा विचार करताय? तर, आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलोय सर्वोत्कृष्ट बाईकचे पर्याय ज्यांची देशभरात सर्वाधिक विक्री होते. अश्याच काही शानदार मायलेजलह स्वस्त आणि किफायतशीर असणाऱ्या दुचाकींबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
कमी किमतीतील जबरदस्त मायलेज देणाऱ्या बाईक्स
TVS XL100
TVS मोपेड बाईक XL100 ला खूप पसंत केले जात आहे. ही बाईक वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी वापरली जाते. उत्तर प्रदेशमध्ये या बाईकची एक्स-शोरूम किंमत ३९,९०० रुपयांपासून सुरू होते. TVS XL 100 मध्ये ९९.७ cc ४ स्ट्रोक, इंधन तंत्रज्ञानासह सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे ४.३ bhp पॉवर आणि ६.५ Nm टॉर्क निर्माण करते. ARAI नुसार, ही बाईक ८० किलोमीटरचा मायलेज देते.
बजाज CT110X
बजाजचा CT110X त्याच्या बोल्ड लूकमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. या बाईकमध्ये ११५.४५ cc इंजिन आहे जे ८.६ PS पॉवर आणि ९.८१ Nm टॉर्क देते. हे इंजिन ४ स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. ही बाईक किक आणि इलेक्ट्रिक स्टार्टने सुसज्ज आहे बाईकचा टॉप स्पीड ९० किमी प्रतितास आहे. ही बाईक एक लिटरमध्ये ७०-७२ kmpl मायलेज देऊ शकते. या बाईकच्या मागील बाजूस एक वाहक दिलेला आहे, जिथे तुम्ही तुमचे सामान ठेवू शकता. बाईकची एक्स-शोरूम किंमत ६७,३२२ रुपये आहे.
(हे ही वाचा : मारुतीच्या ‘या’ स्वस्त ७ सीटर कारला देशात मोठी मागणी; ६० हजाराहून अधिक लोक रांगेतच, मायलेज २६ किमी )
हिरो HF100
Hero MotoCorp ची HF 100 ही परवडणारी आणि टिकाऊ बाईक आहे. ARAI नुसार, ही बाईक ८३ kmpl पर्यंत मायलेज मिळवू शकते. या बाईकमध्ये ९७.२cc इंजिन आहे, जे ८.३६ PS पॉवर आणि ८.०५Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ४ स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. बाईकच्या पुढील आणि मागील चाकांमध्ये ड्रम ब्रेक उपलब्ध आहेत. त्याची एक्स-शो रूम किंमत ५४,९६२ रुपयांपासून सुरू होते.
टीव्हीएस स्पोर्ट्स
ही बाईक स्पोर्टी डिझाइनमध्ये येते. यात ११०cc इंजिन आहे जे ८.२९PS पॉवर आणि ८.७Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ४ स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनुसार, या बाईकने मायलेजमध्ये नवा रेकॉर्ड बनवला आहे. रेकॉर्डनुसार, TVS स्पोर्ट एका लिटरमध्ये ११०.१२ kmpl मायलेज देते. बाईकचा टॉप स्पीड ९० किमी प्रतितास आहे. TVS स्पोर्टची किंमत ६१,५०० रुपयांपासून सुरू होते.