बाइक्स हा तरुणांचा आवडीचा विषय आहे. तिची स्पिडी, मायलेज, जाणून घेण्यासाठी तरुणाई नेहमीच उत्सुक्त असते. आकर्षक डिझाईन तर तरुणांना भुरळच घालते. स्पोर्ट बाईक, क्रुज बाईक, सिटी बाईक अशा अनेक प्रकारात ती मोडते. पण स्पोर्ट्स बाईकचा लूकच हटके असतो. ती वेगवान असते. कमी वेळेत ती तुमच्या नियोजित ठिकाणी तुम्हाला पोहोचवू शकते. सध्या या बाईक्स बाबत लोकांमध्ये खूप क्रेज आहे. तरुण मुले या बाईक्स वापरताना तुम्हाला दिसलीच असतील. आज आपण जगातील काही वेगवान बाईक्स बद्दल जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) २०२३ दुकाटी पाणीगाले व्ही ४ आर (218 एचपी)

source – ducati

2023 Ducati Panigale V4 R ही सर्वात वेगवान स्पोर्ट बाईक आहे. या बाईकमध्ये ९९८ सीसी इंजिन देण्यात आले आहे जे २१८ एचपीची शक्ती देते. त्यात अक्रापोविक रेस एकझॉस्ट जोडल्यावर २३७ एचपी पर्यंतची अतिरिक्त शक्ती मिळते. ही शक्ती आणखी वाढवता येते. इंजिनसाठी विकसित केलेल्या विशेष तेलाचा वापर केल्यास २४०.५ एचपीची शक्ती मिळू शकते. या बाईकचे वजन १८८.५ किलो आहे. रेस करणाऱ्यांसाठी ही बाईक चांगला पर्याय ठरू शकते.

२) होंडा सीबीआर १००० फायरब्लेड एसपी (२१७.५ एचपी)

source – hondabigwing

Honda CBR1000RR Fireblade SP ही जपानी स्पोर्ट बाईक असून तिच्या वेगामुळे युरोपिय नागरिकही तिचे चाहते झाले आहेत. या बाईकमध्ये ९९९.९ सीसीचे इंजिन आहे जे २१७.५ एचपीची पावर देते आणि ११३ एनएमचा टॉर्क देते. या बाईकचे वजन २.१.३ किलो आहे. ही बाईक ३०० किमी प्रति तासाचा वेग पकडण्यात सक्षम आहे.

(५ स्टार सुरक्षा रेटिंग असूनही ‘या’ कारकडे ग्राहकांची पाठ, शेवटी बंद करण्याचा मारुतीचा निर्णय)

३) अप्रिला आरएसव्ही ४ फॅक्टरी (२१७ एचपी)

source – Aprilia

Aprilia RSV4 Factory या बाईकमध्ये १ हजार ९९ सीसीचे व्ही ४ इंजिन आहे जे २१७ एचपीची शक्ती देते. ही इटालियन बाईक आहे.

४) बीएमडब्ल्यू एम १००० आरआर (२१२ एचपी)

source – BMW

BMW M 1000 RR या बाईकमध्ये ९९९ सीसीचे इनलाइन फोर इंजिन मिळते. हे इंजिन २१२ एचपीची शक्ती देते. बाईकचे वजन १९३ किलो आहे.

५) दुकाटी पाणीगाले व्ही ४ रेंज (२१५.५ एचपी)

Ducati Panigale V4 range मध्ये १ हजार १०३ सीसीचे व्ही ४ इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन २१५.५ एचपीची पावर देते आणि १२३.६ एनएमचा टॉर्क निर्माण करते. बाईकचे वजन २०० किलोच्या आत आहे. ही दुकाटीची सर्वात चांगली बाईक असल्याचे सांगितले जाते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top most powerful superbikes list ssb
Show comments