Top-Selling Bikes In Feb 2023: फेब्रुवारी २०२३ मध्ये एकूण दुचाकी विक्री ११,२९,६६१ युनिट्स होती, जी फेब्रुवारी २०२२ च्या तुलनेत ७.६ टक्के जास्त होती, तेव्हा १०,५०,०७९ युनिट्सची विक्री झाली होती. दुचाकी आणि प्रवासी वाहन उद्योगासाठी मार्च हा सकारात्मक महिना ठरला आहे, कारण टॉप टू-व्हीलर OEM – Hero MotoCorp, TVS आणि Suzuki यांनी विक्रीत मजबूत वाढ नोंदवली आहे. मात्र, या मॉडेल्सच्या विक्रीचे आकडे अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला फेब्रुवारी २०२३ मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप-१० बाईक्सबद्दल सांगत आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईक्स (फेब्रुवारी २०२३)

  • Hero Splendor- २,८८,६०५ युनिट्स विकल्या गेल्या
  • Bajaj Pulsar – ८०,१०६ युनिट्स विकल्या गेल्या
  • Hero HF Deluxe – ५६,२९० युनिट्स विकल्या गेल्या
  • Honda CB Shine – ३५,५९४ युनिट्स विकल्या गेल्या
  • TVS Apache – ३४,९३५ युनिट्स विकल्या गेल्या
  • TVS Raider – ३०,३४६ युनिट्स विकल्या गेल्या
  • Royal Enfield Classic 350- २७,४६१ युनिट्स विकल्या गेल्या
  • Bajaj Platina – २३,९२३ युनिट्स विकल्या
  • Yamaha FZ – १२,२६२ युनिट्स विकल्या
  • Royal Enfield Hunter 350- १२,९२५ युनिट्स विकल्या गेल्या

(हे ही वाचा : मारुती, महिंद्रा नव्हे तर ‘ही’ कार आहे देशातील सर्वात सुरक्षित कार, तुम्ही आणि तुमचं कुटुंब राहणार एकदम सेफ )

हिरो अव्वलस्थानी

फेब्रुवारी २०२३ मध्ये, हिरोने स्प्लेंडरच्या २,८८,६०५ युनिट्सच्या विक्रीसह आपले नंबर-१ स्थान कायम ठेवले आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये Hero च्या एकूण विक्रीचा हा मोठा भाग आहे. कंपनीच्या एकूण विक्रीत १५.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तिने ३,८२,३१७ युनिट्सची विक्री केली आहे, तर फेब्रुवारी २०२२ मध्ये ब्रँडने ३,३१,४६२ युनिट्सची विक्री केली आहे. त्याचवेळी, मार्च २०२३ मध्ये, ब्रँडने ५,०२,७३० युनिट्सची विक्री केली, जी मागील वर्षीच्या (मार्च २०२२) याच महिन्याच्या तुलनेत २०.९ टक्क्यांनी जास्त होती.