Top-3 Best Selling Cars: गेल्या काही वर्षापासून भारतीय बाजारात गाड्यांची मागणी प्रचंड वाढली आहे. जानेवारी २०२४ मध्ये, मारुती सुझुकी बलेनो ही सर्वाधिक विक्री होणारी कार होती आणि मारुती वॅगनआर ही तिसरी सर्वाधिक विक्री होणारी कार होती. पण, फेब्रुवारी २०२४ मध्ये बाजी पलटली. वॅगनआर सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आणि बलेनो तिसऱ्या क्रमांकावर आली. या दोघांमध्ये टाटा पंच दुसऱ्या क्रमांकावर कायम राहिली. जानेवारीमध्ये पंच ही दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार होती आणि फेब्रुवारीमध्येही ती दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार राहिली.
जानेवारी २०२४ च्या टॉप-३ सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार
जानेवारी २०२४ मध्ये, १९,६३० युनिट्सच्या विक्रीसह बलेनो ही सर्वाधिक विक्री होणारी कार होती. या कारची विक्री वार्षिक आधारावर २० टक्क्यांनी वाढली आहे. यानंतर टाटा पंच दुसऱ्या क्रमांकावर होते, ज्यांची विक्री १७,९७८ युनिट्स होती. त्याच्या विक्रीत वार्षिक ५० टक्क्यांनी वाढ झाली. त्यानंतर मारुती वॅगनआर तिसऱ्या स्थानावर होती, ज्याची विक्री वार्षिक आधारावर १३ टक्क्यांनी घटून १७,७५६ युनिट्सवर आली.
(हे ही वाचा : मारुतीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारवर मिळतोय बंपर डिस्काउंट; ग्राहकांसाठी पैशाची बचत करण्याची मोठी संधी)
फेब्रुवारी २०२४ च्या टॉप-३ सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार
मारुती वॅगनआर, जी जानेवारी २०२४ मध्ये तिसरी सर्वाधिक विक्री होणारी कार होती, ती फेब्रुवारी २०२४ मध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली. या कारची विक्री १९,४१२ युनिट्स होती. वार्षिक आधारावर कारच्या विक्रीत १५ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. यानंतर टाटा पंच दुसऱ्या क्रमांकावर होती. पंचने १८,४३८ युनिट्स विकल्या आणि त्याची वार्षिक वाढ ६५ टक्के होती.
मारुती बलेनो, जी जानेवारी २०२४ ची सर्वाधिक विक्री होणारी कार होती, ती फेब्रुवारी २०२४ मध्ये तिसऱ्या स्थानावर आली. एकूण १७,५१७ युनिट्सची विक्री झाली. वार्षिक आधारावर या कारच्या विक्रीत ६ टक्क्यांची घट झाली आहे.
थोडक्यात, फेब्रुवारी २०२४ मध्ये, मारुती वॅगन आर १९,४१२ युनिट्सच्या विक्रीसह पहिल्या स्थानावर, १८,४३८ युनिट्सच्या विक्रीसह टाटा पंच दुसऱ्या स्थानावर आणि १७,५१७ युनिटच्या विक्रीसह मारुती बलेनो तिसऱ्या स्थानावर होती.