Best 7 Seater Car: जपानची ऑटोमेकर टोयोटा किर्लोस्कर मोटारची विक्री मे २०२३ मध्ये प्रभावी ठरली आहे. या कंपनीने गेल्या महिन्यात १९,३७९ युनिट्सची विक्री केली आहे, जी गेल्या वर्षीच्या १०,२१६ युनिटच्या तुलनेत ८९.६ टक्के वार्षिक वाढ आहे. कंपनीच्या ७ सीटर कारने विक्रीत १८४ टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे, जी लूक आणि फीचर्सच्या बाबतीत टोयोटा फॉर्च्युनरपेक्षा कमी नाही. मे महिन्यात विकल्या गेलेल्या टोयोटाच्या कारची यादी जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Toyota Innova Hycross

टोयोटा आता इनोव्हा क्रिस्टा आणि हायक्रॉस या दोन नवीन प्रकारांमध्ये विकते. गेल्या महिन्यात या कारच्या ७,७७६ युनिट्स विकल्या गेल्या आहेत. तर वर्षभरापूर्वी मे महिन्यात केवळ २,७३७ युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजेच इनोव्हाच्या विक्रीत १८४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. इनोव्हा क्रिस्‍टाला डिझेल इंजिनचा पर्याय मिळतो तर हायक्रॉस केवळ पेट्रोल आणि पेट्रोल + हायब्रिड पॉवरट्रेनमध्‍ये येतो. इनोव्हा क्रिस्टलची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरू होते आणि २५.४३ लाख रुपयांपर्यंत जाते, तर इनोव्हा हायक्रॉसची किंमत १८.५५ लाख रुपयांपासून सुरू होते आणि २९.९९ लाख रुपयांपर्यंत जाते.

(हे ही वाचा : Tata Punch वर पडणार भारी! देशात येतेय ६ Airbags सोबत सर्वात स्वस्त Micro SUV, ‘इतक्या’ रुपयांत करा बुकिंग )

Toyota Glanza

टोयोटा ग्लान्झा ही कंपनीची प्रीमियम हॅचबॅक कार आहे जी दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यात ५,१७९ युनिट्सची विक्री झाली आहे, तर मे २०२२ मध्ये फक्त २,९५२ युनिट्सची विक्री झाली होती. अशाप्रकारे, ग्लॅन्झाच्या विक्रीत ७५ टक्के वाढ दिसून आली आहे.

Toyota Hyryder 

Toyota Hyryder ही कंपनीची मध्यम आकाराची SUV आहे जी मारुती ग्रँड विटारावर आधारित आहे. मे महिन्यात त्याची विक्री ३,०९० युनिट्स झाली आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर Fortuner चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर Hilux आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toyota car sales may 2023 toyota sold 19379 units last month recording a massive yoy growth of 89 6 percent pdb
First published on: 27-06-2023 at 10:38 IST