Toyota ही एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. टोयोटो किर्लोस्कर मोटरने जवळपास वर्षभराच्या अंतराने Toyota Hilux पिकअप ट्रकसाठी ऑर्डर स्वीकारणे पुन्हा सुरु केले आहे. तसेच कंपनीने या वाहनाच्या किंमतीमध्ये देखील बदल केला आहे. या बद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Toyota Hilux che इंजिन आणि गिअरबॉक्स

Toyota Hilux मध्ये तुम्हाला २.८ लिटरचे चार सिलेंडर टर्बोचार्ज डिझेल इंजिन मिळते. जे मॅन्युअल व्हेरिएंटमध्ये २०१ बीएचपी आणि ४२० एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये ५०० एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते. ट्रासनमिशन ६ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि ६ स्पीड टोक कन्व्हर्टर एटीद्वारे ऑपरेट केले जाते.

हेही वाचा : ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! मारुती सुझुकी Breeza च्या ‘या’ मॉडेलच्या बुकिंगला झाली सुरुवात, मिळणार जबरदस्त फीचर्स

फीचर्स

हिलक्समध्ये ऑल-एलईडी हेडलॅम्प, अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह ८.० इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सहा स्पीकर, पुश बटण स्टार्ट-स्टॉप, ऑटो क्लायमेट कंट्रोल, पॉवर ड्रायव्हर सीट आणि क्रूझ कंट्रोल यांसारखी फीचर्स यामध्ये देण्यात आली आहेत.

टोयोटा हिलक्समध्ये सात एअरबॅग्ज, EBD सह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, वाहन स्थिरता नियंत्रण आणि हिल असिस्ट, फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर्स आणि रिव्हर्स कॅमेरा यांसारखी फीचर्स सुरक्षेच्या दृष्टीने देण्यात आली आहेत. टोयोटा कंपनी हिलक्सवर ३ वर्षे किंवा १,००,००० किमीची मानक वॉरंटी देत ​​आहे.

हेही वाचा : Hyundai ची ‘ही’ कार करणार मारुती सुझुकी आणि टाटाशी स्पर्धा, जाणून घ्या फीचर्स आणि…

किती कमी झाली किंमत ?

Toyota Hilux च्या बेस व्हेरिएंटच्या किंमतीमध्ये ३.६० लाख रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर याच्या टॉप-एन्ड व्हेरिएंटमध्ये १.३५ लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे.