Car Booking Closed: देशातील ऑटो मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या जबरदस्त कार सध्या उपलब्ध आहेत. मोठ्या कुटुंबासाठी बाजारात खास कार उपलब्ध आहेत. या कारमध्ये सातहून अधिक प्रवासी बसू शकतात. भारतीय बाजारपेठेत पॉप्यूलर ७ सीटर कारमध्ये मारुती सुझुकी एर्टिगा, टोयोटा इनोवा क्रिस्टा, टोयोटा इनोवा हाइक्रॉस, किआ कारेन्स, महिंद्रा स्कॉर्पियो-एन, महिंद्रा एक्सयूवी700 आणि टोयोटा फॉर्च्यूनर सारख्या ७ एसयूव्ही आणि एमपीव्ही कार ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.
सात सीटर कारमध्ये मारुती सुझुकी एर्टिगाची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. परंतु आता मारुती एर्टिगा वरही भारी पडणारी कार बाजारात आली आहे. ज्या कारला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्या कारला इतका प्रतिसाद मिळत आहे, की कंपनीला त्या कारचे बुकींगही बंद करावं लागलं आहे.
ही कार हळूहळू पण निश्चितपणे भारतीय बाजारपेठेत आपली पकड मजबूत करत आहे. अलीकडेच, कंपनीने या एमपीव्हीच्या सीएनजी आवृत्तीच्या बुकिंगमध्ये मोठी वाढ नोंदवली आहे. यामुळे कंपनीला त्याचे बुकिंग थांबवावे लागले. प्रलंबित ऑर्डरची वाढती संख्या लक्षात घेऊन कंपनीने या कारच्या सीएनजीचे बुकिंग तात्पुरते बंद केले आहे.
(हे ही वाचा : Traffic Challan: नवा वाहतूक नियम वाचलात का? ९० दिवसांच्या आत चलन न भरल्यास आता मिळेल ‘ही’ शिक्षा )
या कारमध्ये काय आहे खास?
ही कार भारतीय बाजारात नुकतीच लाँच केली आहे. ही कार मारुती सुझुकी एर्टिगा वर आधारित आहे, जी देशातील सर्वाधिक विकली जाणारी MPV आहे. स्टायलिश आणि प्रीमियम एक्सटीरियर डिझाइन, प्रशस्त आणि आरामदायी इंटीरियर आणि धन्सू फिचर्स तसेच पॉवरफूल इंजिनसह ही कार सुसज्ज आहे. या सात-सीटर MPV ला १.५-लिटर K-सिरीज पेट्रोल इंजिन मिळतं, जे १०२bhp पॉवर आणि १३७Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे, तसेच CNG पर्यायामध्ये ते ८७bhp पॉवर आणि १२२Nm टॉर्क निर्माण करते. गिअरबॉक्स पर्यायांमध्ये मॅन्युअल आणि टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक समाविष्ट आहेत.
सुरक्षेच्या दृष्टीने बोलायचं झाल्यास, या कारला ड्युअल फ्रंट आणि साइड एअरबॅग्ज आहेत. त्याच बरोबर या कारमध्ये EBD सह ABS, इंजिन इमोबिलायझर, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP) आणि बरंच काही मिळतं.
कोणत्या कारला ग्राहकांची मोठी मागणी?
ही कार टोयोटाची असून या कारचं नाव Toyota Rumion MPV आहे. ही कार नुकतीच देशात लाँच झाली आहे. मारुती एर्टिगा वर आधारित ७-सीटर टोयोटा रुमिओन MPV नुकतीच १०.२९ लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आली. त्याच्या टॉप मॉडेलची किंमत १३.६८ लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. हे MPV Ertiga प्रमाणेच डिझाइन आणि वैशिष्ट्यांसह येते. मात्र, कंपनीने याला वेगळे बनवण्यासाठी अनेक नवीन फीचर्स आणि डिझाइन अपडेट्स दिले आहेत. मायलेजबद्दल बोलायचे झाले तर, याच्या मॅन्युअल मॉडेलला २०.५१ किमी प्रति लिटर मायलेज मिळते. तर त्याच्या CNG प्रकाराचे मायलेज २६.११ किमी प्रति किलो आहे.
प्रतीक्षा कालावधी काय आहे?
टोयोटा रुमिओनचे बेस मॉडेल रुमिओन निओ ड्राइव्हबद्दल सांगायचे तर, ग्राहकांना त्यासाठी ५ ते ६ महिने वाट पहावी लागेल. डिसेंबरमध्ये बुकिंग सुरू झाल्यापासून त्याचा प्रतीक्षा कालावधी ६-७ महिन्यांपर्यंत पोहोचला. त्यानंतर, प्रलंबित ऑर्डर वाढू नयेत म्हणून, कंपनीने आपल्या सीएनजी प्रकाराचे बुकिंग थांबवले आहे.